शहर बसचे ब्रेक फेल; चारचाकीसह पोलीस गाडीला धडक 

live photo
live photo

स्मार्ट रोडवर आज सकाळी घडलेली घटना 

नाशिक : त्र्यंबक नाक्‍याकडून सीबीएसमार्गे पंचवटीकडे जाणाऱ्या शहर बसचे अचानक ब्रेक झाले. त्यामुळे धावती बस समोरील महिंद्रा कारवर पाठीमागून जाऊन धडकली. तर महिंद्रा कार तिच्यापुढील पोलीस गाडीवर जाऊन धडकली. यात तीनही वाहनांचे नुकसान झाले असून याप्रकरणी बसचालकाविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना आज (ता.23) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली असून, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पुन्हा परिवहन महामंडळाच्या बसेसच्या मेन्टेनन्सचा भोंगळ कारभार समोर आला आहे. 

महिंद्रा कारचे चालक रवींद्र सूर्यकांत पाटील (रा. गंगापूररोड) यांच्या फिर्यादीनुसार, आज (ता.23) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते त्र्यंबक नाक्‍याकडून सीबीएस मार्गे अशोकस्तंभाकडे जात होते. त्यावेळी परिवहन महामंडळाची शहर बस (एमएच 40 एन 9415) पाठीमागून वेगात आली आणि श्री. पाटील यांच्या महिंद्रा कारवर (एमएच 15 इएच 7879) पाठीमागून धडकली. बसच्या जोरदार धडकेमुळे त्यांची कार आणखी वेगात पुढे गेली आणि त्यांच्या कारसमोर धावणाऱ्या शासकीय पोलीस वाहनावर (एमएच 15 एबी 116) पाठीमागून जाऊन धडकली. या विचित्र अपघातामध्ये पाठीमागून धडकलेली शहर बस आणि पुढील शासकीय वाहन या दोन वाहनांच्यामध्ये त्यांची महिंद्रा कार सापडल्याने तिचे नुकसान झाले आहे. सदरील बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे सदरचा अपघात झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. 
याप्रकरणी रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीनुसार, बसचालक सुभाष रामू देवकर यांच्याविरोधात अपघाताचा गुन्हा सरकारवाडा पोलिसात दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवाजी सातभाई हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com