मनोरुग्णाकडून सिव्हिलच्या किचनमध्ये तोडफोड 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

नाशिक : कुटूंबियांसह रोजगाराच्या शोधात साताऱ्याहून आलेल्या मनोरूग्ण तरुणाने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या किचन विभागात घुसून तोडफोड केल्याची घटना घडली. रविवारी (ता.15) सायंकाळी घडलेल्या या घटनेत मनोरुग्णाने स्वत:च्या गळ्यावर कडप्पा मारून घेतला. जखमी मनोरुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

नाशिक : कुटूंबियांसह रोजगाराच्या शोधात साताऱ्याहून आलेल्या मनोरूग्ण तरुणाने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या किचन विभागात घुसून तोडफोड केल्याची घटना घडली. रविवारी (ता.15) सायंकाळी घडलेल्या या घटनेत मनोरुग्णाने स्वत:च्या गळ्यावर कडप्पा मारून घेतला. जखमी मनोरुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पंकज मारुती पाटोळे (30, रा. वडुज, सातारा) असे मनोरुग्णाचे नाव आहे. रोजगाराच्या शोधात पंकज पाटोळे हा पत्नी आणि लहान मुलासह दुचाकीवरून शनिवारी (ता.14) नाशिकमध्ये आला होता. त्याच्या मित्राकडे ते थांबलेले होते. पंकजला मद्याचे व्यसन आहे. मात्र शनिवारी मध्यरात्री त्याचे अचानक मानसिक संतुलन बिघडले आणि तो पळायला लागला. म्हणून त्यास जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच, आज (ता.15) सायंकाळी सहा-साडेसहा वाजेच्या सुमारास तो पुरुष वॉर्डातून बाहेर पडला आणि पळत जात त्याने रुग्णालयाच्या आहार (किचन) विभागात शिरला. किचन विभागातील हॉलमध्ये घुसून त्याने तेथील टेबल-खुर्च्या फेकत, कडप्प्याचा टेबल फोडला. आवाज ऐकून किचन रुममधील महिला कर्मचारी घाबरल्या. तेथील युवकाने मनोरुग्ण पंकज या रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तुटलेला कडप्पा स्वत:च्या मानेवर मारून घेतला आणि परत किचन रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. आहार विभागातील शिला कांबळे यांनी आरडाओरडा केल्याने वॉर्डबॉय मदतीला धावले आणि त्यांनी मनोरुग्ण पंकज यास पकडून इर्मजन्सी वॉर्डमध्ये आणले. सदरची घटनेची माहिती किचन रुममधील महिला कर्मचारी शिला कांबळे यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांना दिली. काही महिन्यांपूर्वीही एका मनोरुग्णाने मध्यरात्रीच्या सुमारास रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर गोंधळ घातला होता. 

अनर्थ टळला 
सदरची घटना घडली त्यावेळी किचन विभागातील महिला कर्मचारी यांची कामे आटोपून सुट्टी होण्याची वेळ होती. आहार (किचन) विभागातील भाजीपाला ठेवण्यात येणाऱ्या हॉलमध्ये मनोरुग्ण घुसला, त्याच हॉलमध्ये महिला कर्मचारी कपडे बदलत असतात. सुदैवाने दोन महिला कर्मचाऱ्यांनी काही क्षणापूर्वीच तेथे कपडे बदलून त्या किचन रुमकडे गेल्या होत्या. अन्यथा महिला कर्मचारी हॉलमध्ये असताना मनोरुग्ण घुसला असता तर मोठा अनर्थ घडला असता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcivilcrimenews