दुचाकी चोरट्याला सक्तमजुरीची शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

नाशिक : जेहान सर्कल परिसरातून पल्सर दुचाकी चोरीप्रकरणी आरोपीला न्यायालयाने एक वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावली. हेमंत राजेंद्र भदाणे (रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर, सातपूर) असे आरोपीचे नाव आहे. 

नाशिक : जेहान सर्कल परिसरातून पल्सर दुचाकी चोरीप्रकरणी आरोपीला न्यायालयाने एक वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावली. हेमंत राजेंद्र भदाणे (रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर, सातपूर) असे आरोपीचे नाव आहे. 

आकाश बळीराम देवरे (रा. गंगोत्री अपार्टमेंट, खुटवडनगर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची पल्सर दुचाकी (एमएच 15 जीजी 0242) 5 ऑगस्ट 2017 रोजी रात्री साडे दहा ते बारा वाजेच्या दरम्यान, जेहान सर्कलजवळील दाते डेअरी दुकानासमोर पार्क केली असता, आरोपी हेमंत भदाणे याने बनावट चावीचा वापर करून चोरून नेली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हवालदार व्ही. बी. उगले यांनी तपास करीत आरोपीला अटक केली आणि मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. 
सदरचा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीधर ढेकळे यांच्यासमोर चालला. तर सरकारी पक्षातर्फे आर.वाय. सूर्यवंशी यांनी कामकाज पाहताना पंच व साक्षीदार तपास पुरावे सादर केले. आरोपी भदाणे याच्याविरोधातील पुरावे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यास 1 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. पैरावी अधिकारी म्हणून पोलीस नाईक वाय. एस. पवार यांनी पाठपुरावा केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcourt-judgment-crimenews