अखेर पांजरापोळ ट्रस्टने भरले 54 लाख 

Residential photo
Residential photo

नाशिक : पंचवटीतील पांजरापोळ ट्रस्टने विजेचा व्यावसायिक स्वरुपासाठी केलेल्या विजेच्या वापरासंदर्भात वीज मंडळाने साडेतीन लाख रुपयांचे विजेचे बिल आकारले होते. त्यासंदर्भात जिल्हा न्यायालयात खटला सुरू असताना, त्यासंदर्भातील पांजरापोळ ट्रस्टचे अपिल न्यायालयाने फेटाळून लावत तब्बल 22 वर्षांनी देयक व त्यावरील व्यास असे 54 लाख रुपयांची रक्कम पांजरापोळ ट्रस्टने अदा करावी लागली आहे. 
 
वीज वितरण कंपनीच्या पंचवटीतील उपविभागात पांजरापोळ ट्रस्टने तत्कालिन वीज मंडळाकडून 1975 व 1977 मध्ये थ्री-फेजचे दोन कनेक्‍शन शेतीपंप व चिलिंग प्लान्टसाठी घेतले होते. 1986 मध्ये वीज मंडळाच्या भरारी पथकाने केलेल्या पाहणीमध्ये सदरील कनेक्‍शनचा वापर पांजरापोळ ट्रस्टकडून व्यावसायिक वापर केला जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे वीज मंडळाने 3 लाख 50 हजार रुपयांच्या वीज देयके अदा केले होते. त्यास ट्रस्टने वीज मीटर नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करीत सदरचे वीजदेयके अदा करण्यास अमान्य केले होते. तसेच, त्यासंदर्भात वीज पुरवठा खंडित न करण्यासाठीचा दावा जिल्हा कनिष्ठ न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने 2005 मध्ये ट्रस्टचा दावा फेटाळून लावला होता. ट्रस्ट त्या निकालाविरोधात जिल्हा न्यायालयात अपिलात गेले होते. 
यासंदर्भात जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायधीश आर. एम. जोशी यांच्यासमोर खटला चालून, महावितरण कंपनीतर्फे ऍड. मनोजकुमार हगवणे-पाटील यांनी बाजू मांडली. जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत ट्रस्ट दावा फेटाळून लावला. तसेच वीज वितरण कंपनीचे थकविलेले देयक आणि त्यावरील दंडा असा 54 लाख 20 हजार 240 रुपयांची रक्कम कंपनीला अदा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महावितरणच्या कनिष्ठ विधी अधिकारी नितल हासे-वर्पे यांनी ट्रस्टला सदरची रक्कम 15 दिवसांच्या आत अदा करण्याची नोटीस बजावली होती. त्याप्रमाणे ट्रस्ट सोमवारी (ता.26) सदरची रक्कम महावितरणकडे जमा केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com