समाज परिवर्तनात तारादूतांची भूमिका महत्त्वाची 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नाशिक : थोर समाजसुधारकांचे संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवितानाच, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलनासह समाज परिवर्तनामध्ये तारादूतांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सारथी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील बोलत होते. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डी.आर. परिहार, मुख्य प्रकल्प संचालक अशोक पवार उपस्थित होते. आयुक्त श्री. नांगरे-पाटील म्हणाले, बेटी बचाओ-बेटी पढाओ, ÷स्त्री पुरुष समानता, महिला सक्षमीकरणासाठी थोर समाजसुधारक, संत, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले यांचे संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचविणे व जागृती करणे, व्यसनमुक्ती अिाण स्वच्छतेचा संदेश गावोगावी पोहोचविणे, आपत्ती निवारण कामांमध्ये सहभाग, संशोधनासाठी सर्वेक्षण व माहिती संकलित करणे. समाजाच्या व देशाच्या हितासाठी एक चांगले सत्कार्य करण्याचे निर्धार तारादूतांनी करावा असे आवाहन केले. यावेळी मुख्य प्रकल्प संचालक अशोक पवार यांनी आयुक्त नांगरे-पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcp-ycmunews