पत्नीच्या खूनप्रकरणी आरोपीला पतीला जन्मठेप 

Residential photo
Residential photo

मद्यासाठी पैसे न दिल्याने कुऱ्हाडीने केला होता खून 

नाशिक : उंबरपाडा (ता. पेठ) येथे मद्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून आरोपी पतीने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वर्मी घाव घालत खून केला होता. याप्रकरणी आरोपी पतीला जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 10 ऑक्‍टोबर 2010 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सदरची घटना घडली होती. 

लक्ष्मण शंकर पोटदार (40, रा. उंबरपाडा, ता.पेठ) असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी कलाबाई (35) हिचा खून केला होता. कलाबाई या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचा तर आरोपी लक्ष्मण यास मद्याचे व्यसन होते. त्यामुळे तो सतत कलाबाई यांना मारहाण करून त्यांच्याकडून मद्यासाठी पैसे घेऊन जात असायचा. 10 ऑक्‍टोबर 2010 रोजी रात्रीही त्याने कलाबाईकडे मद्यासाठी पैसे मागितले. त्यावरून त्यांच्यात भांडण झाले. त्यातूनच आरोपी लक्ष्मण याने मध्यरात्रीच्या सुमारास कुऱ्हाडीने कलाबाई यांच्या मानेवर सपासप घाव घातले. यात गंभीर जखमी झाल्याने कलाबाई यांचा मृत्यु झाला. तर घटनेनंतर आरोपी लक्ष्मण पसार झाला होता. याप्रकरणी कलाबाईचे भाऊ देवराम कानडी यांच्या फिर्यादीनुसार पेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालिन पोलीस निरीक्षक बंदपट्टे यांनी तपास करीत जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. 
सदरचा खटला जिल्हा न्यायधीश विकास कुलकर्णी यांच्यासमोर चालला. सरकारी पक्षातर्फे ऍड. श्रीमती सुप्रिया गोरे यांनी युक्तिवाद करीत सात साक्षीदार तपासले. त्यात आरोपी लक्ष्मणविरोधात पुरावे सिध्द झाल्याने न्या. कुलकर्णी यांनी जन्मठेप व 1 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून संजय आहेर यांनी पाठपुरावा केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com