गीर गाई पालन कर्जाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नाशिक : अल्पभूधारकांसाठी गीर गायींचे पालन व्यवसायासाठी एक कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित महेंद्र दौलत खांदवे, शितल महेंद्र खांदवे (रा. एम्स ऍग्रो परिवार, व्ही स्क्वेअर, साखला मॉलशेजारी, मुंबईनाका), जितेंद्र पांडुरंग पाटील, संतोष कणसे, रामकृष्ण अभंग, सुवर्णा माजगावकर अशी संशयितांची नावे आहेत. 

अजिंक्‍य जयवंत खापरे (रा. उगाव, ता. निफाड, जि. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, एक्‍स ऍग्रो परिवाराचे संचालक महेंद्र खांदवे व शितल खांदवे यांच्यासह जितेंद्र पाटील, संतोष कणसे, रामकृष्ण अभंग, सुवर्णा माजगावकर या संशयितांनी संगनमत करून ÷अल्पभूधारक शेतकऱ्यांना गीर गाईंच्या पालन व्यवसायासाठी 1 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. तसेच त्यातून उत्पादित होणशर मालही वितरित करून त्यामध्ये 50 टक्के भागीदारी देण्याचेही आश्‍वासन दिले होते. त्यासंदर्भात संशयितांनी अजिंक्‍य खापरे यांना आमिष दाखविले. त्यांचा विश्‍वास संपादन करून संशयितांनी गेल्या मे 2019 मध्ये त्यांच्याकडून ऑनलाईन 4 लाख रुपये घेतले. परंतु ठरल्याप्रमाणे संशयितांनी कोणतेही कर्ज दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मुंबई नाका पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यानुसार, संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews