शहरातून कारसह दुचाक्‍या चोरीला;  नाकाबंदी, पोलीस गस्त नावालाच 

Residential photo
Residential photo

नाशिक : इंदिरानगर परिसरातून शेवरोलेट कंपनीच्या कारसह शहर परिसरातून तीन दुचाक्‍याही चोरीला गेल्या आहेत. वाहन चोरट्यांच्या सततच्या कारवायांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे ठिकठिकाणी नाकाबंदी असून पोलीसांची शहरात गस्त आहे की नाही असाही प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला आहे. 

हरजित राजेंद्रसिंह छाछन (रा. साई लिबर्टी आनंद, इंदिरानगर) यांची शेवरोलेट कंपनीची बीट मॉडेल पांढऱ्या रंगाची कार (एमएच 04 एफआर 0030) संशयित ब्रिजेश जगदीश मोरवाल (रा. पंचपरमेश्‍वर सदन, किसननगर, ठाणे) याने गेल्या 17 तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास महिला बॅंकेजवळील साई लिबर्टी आनंदच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
तर, सुनील सुधाकर कावळे (रा. मयूर अपार्टमेंट, राजपाल कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी) यांची सीडी डॉन दुचाकी (एमएच 15 बीके 1498) औरंगाबाद नाक्‍यावरील कराड भेळभत्तासमोर पार्क केली असता गेल्या गुरुवारी (ता.22) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यता आला आहे. विशाल सुरेश गवळी (रा. आर्टिलरी सेंटर रोड, गवळीवाडी, नाशिकरोड) या तरुणाची पल्सर 220 सीसी लाल रंगाची दुचाकी (एमएच 15 इएफ 3696) अज्ञात चोरट्याने गेल्या 17 तारखेला रात्री आठ वाजेच्या सुमारास चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग गोंविदराव भामरे (रा. शिवक्रांती सोसायटी, मेहेरधाम, पेठरोड) यांची डिस्कव्हर दुचाकी (एमएच 15 इव्ही 8976) अज्ञात चोरट्याने गेल्या 10जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com