गावठी कट्टा, जिवंत काडतुसांसह संशयित जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नाशिक : सिडकोतील शिवशक्ती चौकात एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सदरची कारवाई केली असून अल्ताफ अलीम सय्यद (20, रा. पाटीलनगर, पेठे हायस्कुलजवळ, सिडको) असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान, गुन्हेशाखेच्या युनिट एकने गेल्या साडेसात महिन्यात 6 गावठी कट्टे व 8 जिवंत काडतुसे असा 1 लाख 84 हजार रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. 

गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल जुंदरे यांना एक संशयित सिडकोत गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर गुरुवारी (ता.22) सिडकोतील शिवशक्ती चौक-दत्त मंदिरा रोडवर सापळा रचण्यात आला होता. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास संशयित पायी येत असताना, दबा धरून असलेल्या पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा 31 हजार रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. सदरची कामगिरी उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बलराम पालकर, हवालदार संजय मुळक, विशाल काठे, दिलीप मोंढे, विशाल देवरे, स्वप्निल जुंदरे, पठार यांच्या पथकाने बजावली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews