धनादेश न वटल्याप्रकरणी दंडासह कारावास 

Residential photo
Residential photo

नाशिक : हातउसनवार घेतलेले 25 हजार रुपयांची रक्कम परत केली नाही. तगादा लावल्यानंतर दिलेला धनादेशही बॅंकेत न वटल्याने याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला 35 हजार रुपयांचा दंड व 1 महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना सक्ती मजुरीची शिक्षा सुनावली. बबन धनवटे असे आरोपीचे नाव आहे. 

सागर शरद सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी बबन धनवटे हे त्यांच्या ओळखीतील होते. आरोपीचा वडापाव विक्रीचा व्यवसाय होता. आर्थिक अडचणीमुळे आरोपी धनवटे याने सागर सोनवणे यांच्याकडे 25 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी दोन महिन्यांच्या बोलीवर 12 एप्रिल 2015 रोजी दोघा साक्षीदारांच्या साक्षीने आरोपीला 25 हजार रुपये हातउतनवार दिले. मात्र आरोपीने दोन महिन्यांनंतरही रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तगादा लावल्यानंतर आरोपीने 25 हजार रुपयांचा धनादेश दिला. सोनवणे यांनी धनादेश वटविण्यासाठी टाकला असता, तो न वटता परत आला. त्याची माहिती दिल्यानंतरही आरोपीने रक्क देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे सागर सोनवणे यांनी कनिष्ठ न्यायालयात दावा दाखल केला. 
सदरचा खटला प्रथमवर्ग न्यायधीश पी.एस. आपटे यांच्यासमोर चालला. फिर्यादीतर्फे ऍड. अक्षय कलंत्री यांनी युक्तिवाद करीत साक्षीदार तपासले. आरोपीविरोधात पुरावे सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी बबन धनवटे यास दोषी ठरविले आणि 35 हजार रुपये दंडासह एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. अपिलाची मुदत संपेपर्यंत दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला एक महिना सक्तमजुरीची शिक्षाही सुनावली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com