सोन्याची चैन घेत केली मित्राची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

 

 
नाशिक: वाढदिवसाच्या पार्टीसाठी हॉटेलमध्ये घेऊन गेलेल्या संशयिताने फोटो काढण्यासाठी मित्राच्या गळ्यातील सोन्याची चैन घेतली आणि परत न देत फसवणूक केल्याचा प्रकार घडला. सौमित राजन असे संशयिताचे नाव आहे. समीर पांडुरंग मढवी (रा. विद्युतनगरी, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित राजन याचा वाढदिवस असल्याने गेल्या सोमवारी (ता.26) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्याने समीर यांना पार्टीनिमित्त पंचवटी हॉटेलमध्ये नेले. संशयिताने ऑर्डर दिल्यानंतर माझा मित्र येईपर्यंत तू वॉशरुममध्ये जाऊन फ्रेश हो असे सांगितले. त्यावेळी संशयिताने फोटो काढण्यासाठी समीर यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या चैन मागितल्या. समीर यांनीही 1 लाख 20 हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या चैन काढून दिल्या. परंतु संशयिताने नंतर सदरच्या चैन परत न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक डी. वाय. पवार हे तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews