सोनसाखळी चोरटे सीसीटीव्हीत कैद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नाशिक,: भद्रकालीतील काठेगल्ली परिसरास बुधवारी (ता.28) सकाळी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे पोत खेचून दुचाकीवरून भरधाव वेगात गेलेले दोघे सोनसाखळी चोरटे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सदरची माहिती पोलिसांनी ताब्यात, त्यावरून संशयितांना माग काढत आहेत. दरम्यान, संशयित हे इराणी चोरटे असण्याची दाट शक्‍यता पोलिसांनी वर्तविली असून त्यादिशेने गुन्हेशाखेचे पथके रवाना करण्यात आली आहेत. 

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या दोन दिवसात सहा सोनसाखळ्या ओढून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: या सहाही गुन्ह्यांमध्ये संशयितांनी वयोवृद्ध महिलांना टार्गेट केल्याचे दिसून आले आहे. तसेच, शहराच्या कोणत्याही मुख्य रस्त्यावर संशयितांनी गुन्हे केले नसून, त्यांनी कॉलनी रस्त्यांवरील वयोवृद्ध महिलांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ जात सोन्याच्या पोती हिसकावून पोबारा केल्या आहेत. 
घटनेनंतर पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, गुन्हेशाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. दरम्यान, काठेगल्लीमध्ये वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचल्यानंतर संशयितांनी कॉलनी रस्ता सोडून मोठ्या रस्त्यावर आले असता, त्यावेळी एका दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे संशयित दुचाकीसह कैद झाले आहेत. या दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले आहे तर पाठीमागे बसलेल्या संशयिताने मास्क वापरला आहे. यावरून पोलिसांनी संशयितांचा तपास सुरू केला आहे. तसेच, संशयित हे इराणी टोळीशी संबंधित असण्याची शक्‍यताही पोलिसांनी वर्तविली आहे. त्यानुसार, गुन्हेशाखेचे पथक संशयितांच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews