लाखोंचा अवैध गुटख्यासह पीकअप जप्त 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

नाशिक : गुजरातमधून नाशिकमध्ये विक्रीसाठी आणला जाणार, मात्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला सुमारे सहा लाख रुपयांचा अवैध गुटखा पोलिसांनी जप्त केला. पीकअपमधून सदरचा अवैध गुटखा आणला जात असताना मुंबई नाका पोलिसांनी महामार्गावर सदरची कारवाई केली. पीकअपसह गुटखा असा 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून एकास अटक केली आहे. 

नाशिक : गुजरातमधून नाशिकमध्ये विक्रीसाठी आणला जाणार, मात्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला सुमारे सहा लाख रुपयांचा अवैध गुटखा पोलिसांनी जप्त केला. पीकअपमधून सदरचा अवैध गुटखा आणला जात असताना मुंबई नाका पोलिसांनी महामार्गावर सदरची कारवाई केली. पीकअपसह गुटखा असा 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून एकास अटक केली आहे. 

जैद सलाउद्दीन शेख (33, रा. पाथर्डी फाटा, इंदिरानगर) असे संशयिताचे नाव आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सचिन करंजे यांना अवैधरित्या गुटख्याचा मोठा साठा घेऊन वाहन द्वारकेच्या दिशेने येत असल्याची खबर मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. तसेच, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारीही सापळ्यात सहभागी झाले. महामार्गावरील द्वारका ते इंदिरानगर बोगदा उड्डाणपुलावर सापळा रचण्यात आला असता, शनिवारी (ता.31) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाचा पीकअप (एमएच 15 डीके 4352) बोगदा ओलांडून आला. दबा धरून असलेल्या पथकाने सदरचा पीकअप रोखला आणि पंचासमक्ष तपासणी सुरू केली असता, त्यामध्ये पांढऱ्या रंगांच्या पोत्यामध्ये रंगबाज पान मसाला गुटख्याचा मोठा साठा सापडला. 6 लाख रुपयांचा सदरचा गुटखा महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध आहे. पीकअपचालक शेख यास अटक करण्यात आली. 6 लाखांचा गुटखा आणि 4 लाखांचे वाहन असा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल मुंबई नाका पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात अन्न-सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, अन्न सुरक्षा अधिकारी दिलीप सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रेश्‍मा अवतारे, सुहास क्षीरसागर, सचिन करंजे, शेवरे, गायकवाड यांच्या पथकाने बजावली. अधिक तपास उपनिरीक्षक रेश्‍मा अवतारे या करीत आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews