म्हाडाचे घराचे आमिष दाखवून घातला लाखोंचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

नाशिक : म्हाडा स्कीममध्ये घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवून निम्मे पैसे करण्यास सांगितले आणि त्यांच्याच कागदपत्रांची बनावट दस्तऐवज बनवून दोघा संशयितांनी तिघांची लाखो रुपयांची फसवणूक केलीच. शिवाय, त्यांच्याच कागदपत्रांच्या आधारे म्हाडाचे फ्लॅट मिळवून तो बळकावल्याचाही प्रकार घडला आहे. याप्रकरणी संशयित डॉ. सुरेश विष्णू उमराणकर, ज्योती अशोक राऊत उर्फ ज्योती उत्तम ठाकरे (दोघे रा. शिवशक्ती चौक, सिडको) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रंजना बबन सुरडकर उर्फ रंजना रतन ठाकरे, बबन भिकन सुरडकर (दोघे रा. नवनिर्माण चौक, गायकवाड चाळ, मखमलाबाद नाका, पंचवटी) आणि हिम्मतराव दामू ठाकरे यांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. रंजना सुरडकर यांच्या फिर्यादीनुसार, 2009 मध्ये संशयित डॉ. सुरेश उमराणकर, ज्योती राऊत या दोघांनी फिर्यादीसह तिघांचा विश्‍वास संपादन केला आणि त्यांना म्हाडाच्या स्किममधून घरे मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी संशयितांनी त्यांना निम्मे पैसे भरण्यास भाग पाडले. फिर्यादी व नातलगांकडून संशयितांनी रहिवासाच्या पुराव्यांसह मूळ कागदपत्रे घेतली. या कागदपत्रांच्या आधारे संशयितांनी बनावट दस्तऐवज तयार केले. यात रंजना सुरडकर या निरक्षर असताना त्यांना पत्रकार असल्याचे संशयितांनी दाखवत तसा खोटा पुरावाही दिला. तसेच, त्यांच्याऐवजी दुसरीची व्यक्ती हजर करून म्हाडाच्या घराचा ताबा संशयितांनी घेतला. याचप्रमाणे, हिम्मतराव ठाकरे यांच्या कागदपत्रांच्या आधारे खोटी माहिती, सह्या खोट्या देत आणखी एक म्हाडाचा फ्लॅट बळकावला. या फ्लॅटमध्ये संशयित उमराणकर याचा मुलगा व सून राहत आहेत. त्याचप्रमाणे, संशयितांनी फिर्यादी व त्यांच्या नातलगांच्या नावाने सारस्वत बॅंक, उंटवाडीच्या आंध्र बॅंकेत खोटे बनावट खाते उघडून त्यावरून व्यवहार केले आहेत. याप्रकरणी संशयितांविरोधात पंचवटी पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews