महिला वाहतूक पोलीसाशी घातली हुज्जत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

नाशिक : नाशिक-पुणा महामार्गावरील फेम सिग्नल येथे स्कुटरचालकाने सिग्नल तोडून रहदारीला अडथळा निर्माण केल्याचा जाब, त्याचठिकाणी कर्तव्यावर असलेल्या महिला वाहतूक पोलिसांनी विचारला. त्याचा राग येऊन संशयिताने महिला पोलिसाच्या अंगावर स्कुटर घालून त्यांचा हात पिरगळला. तसेच संशयित दोघांनी अर्वाच्य भाषा वापरून दोघा पोलिसांना दमदाटी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी उपनगर पोलिसात दोघा संशयिताविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आकाश सुब्बीर जाटप (19, रा. जमीन अपार्टमेंट, पुणारोड), विष्णू भगवान तांबे (23, रा. पंचशिलनगर, शिवाजीनगर, नाशिकरोड) असे दोघा संशयितांचे नाव आहे. वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार निकम आणि महिला पोलीस नाईक चंद्रकला कवडे हे गेल्या मंगळवारी (ता.3) नाशिक-पुणा महामार्गावरील फेम सिग्नल येथे नियुक्तीला होते. सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास बिटकोकडे जाणाऱ्या मार्गावर लाल रंगाची स्कुटरवरील (एमएच 15 एफझेड 0015) संशयित चालक आकाश याने सिग्नल तोडला आणि मध्यभागी थांबला. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला. महिला वाहतूक पोलीस चंद्रकला कवडे यांनी, विनाहेल्मेट असलेल्या संशयितास जाब विचारला असता, संशयित आकाश याने स्कुटर रस्त्याच्या बाजुला घेणार नाही. तुला काय करायचे ते कर असे म्हणत त्यांची लायकी काढली. तसेच, तु माझी नोकर असल्याचे म्हणत त्यांच्या अंगावर स्कुटर घातली. यात त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. तसेच त्यांचा हात पिरगळून आरडाओरडा करू लागला. पोलीस हवालदार निकम हे त्याठिकाणी आले असता, संशयित चालकामागे बसलेला दुसरा संशयित तांबे यानेही पोलिसांना शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. संशयितांकडे हेल्मेट नव्हते, परवाना, कागदपत्रेही नव्हती. त्यामुळे याप्रकरणी उपनगर पोलिसात सरकारी कामात अडथळा आणि वाहतुकीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews