विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून मालेगावात बंदोबस्तांचा आढावा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

नाशिक : संवेदनशील असलेल्या मालेगाव शहरात मंगळवारी (ता.10) मोहरम्‌ निमित्ताने ताजिया सवारी मिरवणूक काढण्यात येत असल्याने, त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. तसेच, येत्या गुरुवारी (ता.12) गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक असल्याने त्यानिमित्ताने शहरातील पोलीस बंदोबस्ताचीही आढावा घेण्यात आला. 

यंदा मुस्लिम बांधवाचा मोहरम आणि हिंदूबांधवाचा गणेशोत्सव एकाचवेळी आहेत. त्यामुळे सामाजिक सलोखा कायम राखण्याच्या दृष्टिकोनातून पोलीसांनी उत्सवापूर्वीच शांतता समितीच्या बैठका घेत आगामी सणउत्सत शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. 
मंगळवारी (ता.10) मोहरम निमित्ताने मालेगाव शहरातून मिरवणूक काढण्यात येत असते. तर, येत्या गुरुवारी (ता.12) गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक निघणार आहेत. त्यामुळे संवेदनशिल असलेल्या मालेगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिरवणूक मार्गांची पाहणी करीत आढावा घेतला. यावेळी मिरवणूक मार्गात असणारे विजेच्या तारा, रस्त्यावरील खड्डे याबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच, मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्याही सूचना केल्या आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews