परराज्यातील चंदनचोरट्यांच्या टोळीचा शहरात शिरकाव 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

इंदिरानगर गस्ती पथकाने एकाला केली अटक : दिवसा रेकी; रात्री तोडणी 

नाशिक : चंदनाच्या झाडांची तोड करून बुंधा चोरून नेणाऱ्या परराज्यातील टोळी शहर परिसरात वास्तव्याला असून यातील एकाला इंदिरानगर पोलिसांच्या गस्तीपथकाने पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. तिघे संशयित अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत. शहरात रस्त्यालगतच्या फुटपाथवर वा निर्जनस्थळी राहुट्या टाकून वास्तव्य करणाऱ्या मध्यप्रदेशातील पारध्यांच्या टोळीकडून शहरात चंदनाच्या झाडांची चोरी केली जात असल्याचे तपासातून समोर आले आहे. संशयिताकडून आणखीही गुन्ह्याची उकल होण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून शहर-परिसरात शासकीय-खासगी जागेतील चंदनाच्या झाडांची रात्रीच्या वेळी तोडून चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन आठवड्यांपूर्वी गुन्हेशाखेने दोघांना अटकही केली होती. मात्र तरीही चंदनचोरीचे प्रकार सुरूच होते. दरम्यान, इंदिरानगर परिसरातील मोदकेश्‍वर मंदिर परिसरात चंदनचोर आल्याची खबर इंदिरानगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी मोदकेश्‍वर परिसरास सापळा रचून चोरट्यांचा शोध घेतला. परंतु संशयित चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यानंतर पोलिसांकडून रात्रभर गस्त सुरू असतानाच पहाटे पाच वाजेच्या सुमारास बीटमार्शल कडाळे यांना चौर्वाक चौकात चौघे संशयास्पदरित्या वावरताना दिसून आले. त्यावेळी, बीटमार्शल कडाळे यांनी संशयितांना हटकले असता, त्यांनी पळ काढला. बीटमार्शल कडाळे यांनी तात्काळ बिनतारी संदेशयंत्रणेवरून गस्तीपथकाला संदेश दिला. त्यानुसार परिसरात नाकाबंदी केली असता, एक संशयित जिलोन सिलोन पारधी (25, रा. खैरणी, जि. जबलपूर, मध्यप्रदेश) यास अटक करण्यात आली तर, तिघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. संशयिताने मोदकेश्‍वर मंदिर परिसरातील चंदनाच्या झाड आणि यापूर्वीच्या गरवारे हाऊसमधील चंदन झाड तोडीची कबुली दिली आहे. त्याच्याकडून करवत, कुऱ्हाड ही हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी सुमेद श्रावण वाटोरे (रा. मोदकेश्‍वर कॉलनी, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, भगवान शिंदे, राहुल कडाळे, रियाज शेख यांनी बजावली. 

दिवसा रेकी; रात्री चंदन चोरी 
मध्यप्रदेशातून आलेले चंदनचोरी करणाऱ्या संशयित पारध्यांनी शहरात रस्त्यालगतच्या फुटपाथ वा निर्जनस्थळी राहुट्या उभारल्या आहेत. संशयित दिवसा शहर-परिसरात चंदनाच्या झाडांची रेकी करतात आणि रात्रीच्या वेळी चंदनाच्या झाडाची तोड करून बुंधा चोरून नेतात. बुंधा नेताना गोणीत, कापडात गुंडाळून नेतात. त्यामुळे कोणालाही संशय येत नाही, अशी या टोळीची पद्धत असून पोलिसांनी राहुट्या करून राहणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews

टॅग्स