दुचाकी जाळपोळीतील दोघांना वडाळ्यातून अटक 

Residential photo
Residential photo

नाशिक : पांडवनगरी परिसरातील इमारतीच्या पार्किंगमध्ये गेल्या महिन्यात दुचाकींची जाळपोळ केल्याप्रकरणी गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने दोघांना अटक केली. वडाळागावातून दोघांना सापळा रचून अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवार (ता.14) गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने वडाळागावात सापळा रचून गणेश जडबुले (25, रा. रामोशीवाडा, वडाळागाव), उत्तम साळवे (24, रा. राजवाडा, वडाळागाव) या संशयितांना अटक केली. पांडव नगरी परिसरातील आकाश आरंभ सोसायटीत सदरची घटना घडना 27 ऑगस्टच्या रात्री घडली होती. अजय उपासणी यांच्या मालकीच्या दोन दुचाकी सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या होत्या. मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान दोघा संशयितांनी अज्ञात कारणातून त्यांच्या या दोन्ही दुचाकी जाळल्या होत्या. यात दुचाकीचा सांगाडाच शिल्लक राहिला होता. याप्रकरणी उपासनी यांनी इंदिरानगर पोलीसात फिर्याद दिली होती. गुन्हेशाखा युनिट दोनचे युवराज पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघा संशयितांच्या मुसक्‍या आवळण्यात आल्या. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अभिजीत सोनार, उपनिरीक्षक विजय लोंढे, युवराज पाटील, श्रीराम सपकाळ, प्रमोद दराडे, अन्सार सय्यद, नितीन भालेराव, बाळा नांद्रे, योगेश सानप, महेंद्र साळुंखे, संतोष ठाकूर यांच्या पथकाने बजावली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com