पोलिसाला धक्काबुक्की 

Residential photo
Residential photo


नाशिक : सातपूर परिसरात पोलीस चौकीसमोर कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना अश्‍लिल शिवीगाळ करीत धक्काबुक्की करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश उर्फ संकेत पुंडलिक पवार (25, रा. पाण्याच्या टाकीजवळ, साई चौक, राधाकृष्णनगर, सातपूर) असे संशयिताचे नाव आहे. पोलीस हवालदार बाजीराव सहादू भिसे यांच्या फिर्यादीनुसार, ते आणि पोलीस नाईक वाघमारे हे दोघे बोलकर व्हॅली पोलीस चौकी येथे गेल्या शनिवारी (ता.14) कर्तव्यावर होते. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयित संकेत पवार याने सार्वजनिक शांततेचा भंग करीत मोठमोठ्याने अश्‍लिल शिवीगाळ केली. पोलीस हवालदार भिसे यांनी त्यास रोखले असता, त्याने दोघा पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच गर्दीचा फायदा घेत पसार झाला. याप्रकरणी सातपूर पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com