महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

नाशिक : इंदिरानगर परिसरातील शहर बसच्या पिकअप शेडमध्ये थांबलेल्या दोन महिलांकडील तीन मोबाईल हिसकावून संशयित तिघांनी पोबारा केला. अर्चना बालाजी ससाणे (रा. राजूर बहुला, ता. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या सोमवारी (ता.16) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अर्चना ससाणे व मैत्रिण पूजा गंगाराम पावडे या दोघीं गरवारे हाऊस येथील शहर बसच्या पिकअप शेडमध्ये बसची वाट पाहत थांबलेल्या होत्या. त्यावेळी 18 ते20 वयोगटातील तिघे संशयित तोंडाला रुमाल बांधून त्यांच्याजवळ आले आणि दोघीांना काही सूचायच्या आत संशयितांनी दोघींच्या हातातील 14 हजार रुपयांचे तीन मोबाईल बळजबरीने हिसकावून पोबारा केला.

नाशिक : इंदिरानगर परिसरातील शहर बसच्या पिकअप शेडमध्ये थांबलेल्या दोन महिलांकडील तीन मोबाईल हिसकावून संशयित तिघांनी पोबारा केला. अर्चना बालाजी ससाणे (रा. राजूर बहुला, ता. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या सोमवारी (ता.16) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अर्चना ससाणे व मैत्रिण पूजा गंगाराम पावडे या दोघीं गरवारे हाऊस येथील शहर बसच्या पिकअप शेडमध्ये बसची वाट पाहत थांबलेल्या होत्या. त्यावेळी 18 ते20 वयोगटातील तिघे संशयित तोंडाला रुमाल बांधून त्यांच्याजवळ आले आणि दोघीांना काही सूचायच्या आत संशयितांनी दोघींच्या हातातील 14 हजार रुपयांचे तीन मोबाईल बळजबरीने हिसकावून पोबारा केला. विवोचा 8 हजार रुपये, सॅमसंगचा 3 हजार रुपये तर इन्टेक्‍सचा 3 हजार रुपये अशा तीन मोबाईलचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews