राष्ट्रवादीने सोडले काळे फुगे 

live photo
live photo

राजकीय पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी स्थानबद्ध 

नाशिक : भाजपाची महाजनादेश यात्रा आणि उद्या (ता.19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणारी जाहीर सभा पाहता, राजकीय पदाधिकारी वा संघटनांकडून होणाऱ्या आंदोलनाची धास्ती घेत, शहर-ग्रामीण पोलिसांनी शेकडो पदाधिकाऱ्यांची धडपकड केली. तर माजी आमदारांसह काही पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीतर्फे भाजपाच्या महाजनादेश यात्रेच्या निषेधार्थ आकाशात काळे फुगे सोडून निदर्शने करण्यात आली. 

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस व युवक कॉंग्रेस यांच्यातर्फे नाशिक महाजनादेश यात्रेच्या मार्गादरम्यान मुंबई नाका येथे काळे फुगे सोडून निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुशोत्तम कडलग, रविंद्र शिंदे, सुरेखा निमसे, सायरा शेख, मेघा दराडे, संदीप गोत्राणे, निखील भागवत, गणेश गायधने, संदीप भेरे, विजु आहिरे, प्रफुल पवार, अक्षय भोसले, मानिक कडलग यांनी भाजपा सरकारविरोधात निदर्शने करीत घोषणाबाजी केली. 
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सातपुर विभाग अध्यक्ष जीवन रायते, सिडको कांग्रेस ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील, शिवाजी मटाले, छगन भंदुरे, अरुण भोसले, नावराज रामराजे, नितीन बाळा निगळ, अमोल भावले, मुकेश शेवाळे, गणेश भावले, संदीप हांडगे, रोहित यादव, मुन्ना तुपे, नारायण गायकवाड़, शरद सांगळे, राहुल बैरागी यांना आज नोटीसा बजावित सातपूर पोलिसांनी स्थानबद्ध केले. 
देवळाली कॅम्प पोलिस स्टेशन येथेही काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत स्थानबद्ध करण्यात आले. यात राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार, स्वाभीमानीचे हंसराज वडघुले, शहर युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. 
विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्याना भद्रकाली पोलिसांनी नोटीस बजावण्यात येऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कॉग्रेस सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकुर, कॉग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहरअध्यक्ष हनिफ बशीर, ज्ञानेश्‍वर काळे, अशोक शेंडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजय ठाकरे, ललीत खैरनार, चेतन खैरनार यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, म्हसरुळ पोलिसांनी भाकपचे राज्य सचिव राजू देसले, महादेव खुडे यांना नोटीस बजावून स्थानबद्ध केले आहे. 

माजी आमदारांना नोटीस 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार नितीन भोसले यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यासह शहरातील काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावली असून काहींना नजरकैद केल्याचेही समजते. 

 
आम्ही अतिरेकी आहोत का? ज्यामुळे आम्हाला पोलिसांकरवी नोटीसा बजाविण्याची वेळ भाजपावर आली. भाजपाने जर कामे केली असती तर अशी वेळच आली नसती. त्यांनी जनतेची कामे केलेली नाहीत म्हणून ते आमचा आवाज अशारितीने दाबू पहात आहेत. 
- नितीन भोसले, माजी आमदार. 

ज्या नाशिकला मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले होते, त्याच नाशिकमध्ये त्यांनी काय केले, याचा आम्हाला जाब विचारायचा आहे. तो विचारता येऊ नये म्हणून भाजपाकडून पोलिसांचा वापर करीत आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले आहे. 
- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com