अश्‍लिल मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नाशिक : पीडित महिलेचा पाठलाग करून तिच्या मोबाईलवर वारंवार फोन करून वा अश्‍लिल संदेश पाठवून धमकी देणाऱ्या संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निनाद मिलिंद बागुल (30, रा. विहितगाव, बुद्धविहारसमोर, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित निनाद बागुल याने मार्च ते गेल्या शनिवारपर्यंत पीडित महिलेस वारंवार 23 फोन आणि 12 व्हॉटसऍप संदेश पाठविले. यात त्याने तू मला खुप आवडते. तू माझा स्वीकार केला नाही तर मी आत्महत्त्या करीन. तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेन. तुझ्यावर खोटा ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करीन. तुझी मुलगी एकटी फिरते.

नाशिक : पीडित महिलेचा पाठलाग करून तिच्या मोबाईलवर वारंवार फोन करून वा अश्‍लिल संदेश पाठवून धमकी देणाऱ्या संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निनाद मिलिंद बागुल (30, रा. विहितगाव, बुद्धविहारसमोर, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित निनाद बागुल याने मार्च ते गेल्या शनिवारपर्यंत पीडित महिलेस वारंवार 23 फोन आणि 12 व्हॉटसऍप संदेश पाठविले. यात त्याने तू मला खुप आवडते. तू माझा स्वीकार केला नाही तर मी आत्महत्त्या करीन. तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेन. तुझ्यावर खोटा ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करीन. तुझी मुलगी एकटी फिरते. माझ्या आईला तुझ्या ऑफिसमध्ये पाठवून तुला बदनाम करीन अशा धमक्‍या देत अश्‍लिल संदेशही पाठविले. तसेच पीडितेचा सतत पाठलाग करीत त्रास दिला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आली असून संशयितास अटक करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews