पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नाशिक : भिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या संशयिताला पोलिस कर्मचाऱ्याने रोखले असता, संशयिताने पोलीस कर्मचाऱ्यालास धक्काबुक्‍की केल्याच प्रकार घडला. अक्षय दगू फाळके (25, रा. जायभावे चाळ, राणेनगर, सिडको) असे संशयिताचे नाव आहे. स्वप्निल विश्‍वास सपकाळे यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या शनिवारी (ता.21) दुपारी नारायण बापूनगर येथील हॉली फ्लॉवर येथे कर्तव्यावर होते. त्यावेळी संशयित अक्षय फाळके हा रस्त्यावरील भिकाऱ्याला मारहाण करीत होता. ते पाहून पोलीस कमर्चारी सपकाळे यांनी त्यास रोखले आणि विचारणा केली. त्याचा राग येऊन संशयित अक्षय मद्याच्या नशेत होता. त्याने पोलीस सपकाळे यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तसेच त्यांच्याकडील वॉकीटॉकी हिसकावून फेकून दिला. याप्रकरणी उपनगर पोलिसात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews