बालचित्रकारांनी रेखाटले नाजूक विषयांवर चित्र 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जनजागरुकता : चाईल्ड लाईनच्या चित्रकला स्पर्धेत संज्योत प्रथम 

जनजागरुकता : चाईल्ड लाईनच्या चित्रकला स्पर्धेत संज्योत प्रथम 

नाशिक : मविप्र समाजाच्या समाजकार्य महाविद्यालय, नवजीवन फाउंडेशन संचालित चाईल्ड लाईनतर्फे बालकांच्या समस्यांवर आधारित चित्रकला स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मराठा हायस्कुलची संज्योत गवते हिने पटकावले. या चित्रकला स्पर्धेमध्ये बालचित्रकारांनी स्त्री-भ्रूण हत्त्या, बालकामगार प्रतिबंध, बालविवाह प्रतिबंध आणि बाल भिक्षेकरी प्रतिबंध यासारखे नाजूक विषयांवर आपल्या कल्पनाशक्तीने चित्र रेखाटले. चिमुकल्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या मुख्य उद्देशाने चाईल्डलाईन 1098 या मोफत क्रमांकाच्या जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

परीक्षक म्हणून मविप्र समाज संस्थेचे कलाशिक्षक सोमेश्वर मुळाणे, चाईल्ड लाईनचे संचालक प्राचार्य डॉ.विलास देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सोमेश्वर मुळाणे, डॉ. विलास देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात मराठा हायस्कुलची संज्योत गवते हिने प्रथम, विद्या प्रबोधिनी प्रशाळाची तबस्सूम खान हिने द्वितीय, वाय.डी. बिटकोचा सागर विश्वकर्मा याने तृतीय तर मराठा हायस्कुलची हर्षाली पाटील हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवून बक्षिसे पटकावली. तर, 9 विद्यार्थ्यांना विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 
यावेळी चाईल्डलाईन केंद्र समन्वयक प्रवीण आहेर यांनी चाईल्ड लाईनची कार्यप्रणाली विशद केली. जयेश शिसोदे यांनी सूत्रसंचालन केले तर शहर समन्वयक प्रणिता तपकिरे यांनी आभार मानले. यावेळी प्रा. सुनीता जगताप, कलाशिक्षक जगदीश डिंगे, सुभाष अहिरे, पालकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोनाली शिंदे, शुभम मोगरे, शीतल सोनगिरे, शुभांगी खानकरी, सारंगधर घाटे, चाईल्डलाईन सदस्य अतुल डांगळे, निखिल पाटील यांनी परिश्रम घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews