पोलीसानेच केला महिलेचा विनयभंग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

दुचाकीवरून उडी घेत केली सुटका : फ्लॅट दाखविण्याचा केला होता बहाणा 

दुचाकीवरून उडी घेत केली सुटका : फ्लॅट दाखविण्याचा केला होता बहाणा 

नाशिक : औरंगाबदरोडवर फ्लॅट दाखविण्याच्या बहाण्याने आणून पोलीस कर्मचाऱ्यानेच महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. पीडितेने धावत्या दुचाकीवरून उडी घेत स्वत:ची सुटका करून घेतल्याने पुढील अनर्थ ठळला. निलेश वाघमारे (35, रा. नाशिक) असे संशयित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो नाशिकरोड पोलीस ठाण्यात नेमणुकीला आहे. 
 
पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, संशयित निलेश वाघमारे याने गेल्या सोमवारी (ता.23) सकाळी दहा वाजेच्या सुमारास पीडित महिलेला औरंगाबाद रोड परिसरात असलेला फ्लॅट दाखविण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याने पीडितेच्या स्वत:च्या दुचाकीवरून औरंगाबाद रोडवरील एका इमारतीजवळ नेले. त्यावेळ संशयित वाघमारे याने पीडितेला अपार्टमेंटमध्ये येण्याचा आग्रह केला. मात्र पीडितेने नकार दिला असता, त्याने पीडितेचे दोन्ही हात पकडून बळजबरीने जवळ ओढले आणि लज्जास्पद कृत्य केले. त्यानंतर पीडितेने त्या ठिकाणाहून पायीच घराकडे जाण्यास निघाली असता, संशयित वाघमारे याने पीडितेचा पाठलाग करीत नांदूर नाका येथे गाठले आणि पीडितेला परत दुचाकीवर बळजबरीने बसविले. त्यानंतर संशयिताने पुन्हा दुचाकी औरंगाबाद रोडच्या दिशेने वळविली असता, पीडितेने धावत्या दुचाकीवरून उडी घेतली. त्यामुळे पीडितेच्या हाताला, तोंडाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसात संशयित पोलीस कर्मचारी वाघमारे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews