पाण्याच्या टाकून पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

बंगल्याच्या आवारात झाकण नसलेला हौद ठरला काळ 

नाशिक : विहितगाव परिसरात असलेल्या बंगल्याच्या आवारातील पाण्याच्या टाकीमध्ये पडून अवघ्या तीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवीरित्या बुडून मृत्यु झाला. पाण्याच्या या टाकीला झाकण नसल्याचे सांगण्यात येते. सदरची घटना आज (ता.29) दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 

आराध्य सचिन वाघ (3, रा. कृपासिंधू बंगला, विहितगाव) असे चिमुकल्याचे नाव असून तो वाघ दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. सचिन वाघ हे एलआयसीच्या मुंबई शाखेत अधिकारीपदावर नोकरीला आहेत. ते कुटुंबियांसह विहितगाव येथील त्यांच्या कृपासिंधू बंगल्यात राहतात. आज (ता.29) दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा चिमुकला मुलगा आराध्य बंगल्यातून बाहेर निघून आवारातच खेळत होता. मात्र बराच वेळ होऊनही तो परत घरात आला नाही. तसेच त्याची काही चाहूलही न लागल्याने कुटूंबियांनी त्याला शोधले असता तो दिसला नाही. त्यामुळे कुटूंबियांनी त्याचा आसपास शोध सुरू केला. मात्र त्याचा काहीही मागमूस लागत नसल्याने कुटूंबिय घाबरले. त्यावेळी बंगल्याच्या आवारातील पाण्याच्या टाकीजवळ आराध्य याची बासरी दिसली असता, त्यांनी टाकीत पाहिले असता त्यात आराध्य दिसला. तात्काळ त्यास पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले आणि तात्काळ बिटको रुग्णालयात दाखल कले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, बंगल्याच्या आवारात असलेल्या त्या पाण्याच्या टाकीला झाकण नसल्यानेच सदरची दुर्घटना घडल्याचे बोलले जाते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews