बळजबरीने वर्गणीची मागणी; खंडणीचा गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

नाशिक : शासकीय आयटीआयच्या पाठीमागील रस्त्यावर कार अडवून बळजबरीने देवीची वर्गणी मागून मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर देविदास कडाळे (21), अक्षय प्रकाश शार्दुल (19), रोशन भास्कर कांबळे, आशिष बाबाजी मोरे (चौघे रा. स्वारबाबानगर, सातपूर) अशी संशयितांची नावे आहेत. जयप्रकाश जोशी (रा. डिसुझा कॉलनी, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या बुधवारी (ता.2) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कारने आयटीआयच्या पाठीमागील रस्त्याने जात होते. त्यावेळी संशिंतयांनी त्यांची कार रोखली आणि त्यांच्याकडे नवरात्रीची 5 हजार रुपयांची वर्गणीची मागणी केली.

नाशिक : शासकीय आयटीआयच्या पाठीमागील रस्त्यावर कार अडवून बळजबरीने देवीची वर्गणी मागून मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर देविदास कडाळे (21), अक्षय प्रकाश शार्दुल (19), रोशन भास्कर कांबळे, आशिष बाबाजी मोरे (चौघे रा. स्वारबाबानगर, सातपूर) अशी संशयितांची नावे आहेत. जयप्रकाश जोशी (रा. डिसुझा कॉलनी, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या बुधवारी (ता.2) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कारने आयटीआयच्या पाठीमागील रस्त्याने जात होते. त्यावेळी संशिंतयांनी त्यांची कार रोखली आणि त्यांच्याकडे नवरात्रीची 5 हजार रुपयांची वर्गणीची मागणी केली. जयप्रकाश जोशी यांनी नकार दिला असता, संशयितांनी जोशी व कारचालक यांना मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी कारसह येणाऱ्या जाणाऱ्यांवर दगडफेक करीत शिवागाळ करीत पोबारा केला. याप्रकरणी सातपूर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक काळे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews