तलवारीचा धाक दाखवून चंदनाचे झाड कापले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

नाशिक : गंगापूर रोडवरील भोसला सैनिकी शाळा येथे सुरक्षारक्षकास तलवारीचा धाक दाखवून चंदनाचे झाड कापून नेण्याचा प्रयत्न चौघांनी केला. मात्र अन्य सुरक्षारक्षक मदतीला धावून आल्याचे पाहून चोरट्यांनी कापलेले झाड सोडून पोबारा केल्याची घटना घडली. दिनेश जगन्नाथ सोनवणे (रा. मखमलाबादगाव, नाशिक) या सुरक्षारक्षकाच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (ता.6) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चौघांनी भोसला सैनिकी शाळेच्या कंमाटो गेटवर असलेल्या केबीनमध्ये असलेल्या सुरक्षारक्षक दिनेश यास तलवारीचा धाक दाखविला.

नाशिक : गंगापूर रोडवरील भोसला सैनिकी शाळा येथे सुरक्षारक्षकास तलवारीचा धाक दाखवून चंदनाचे झाड कापून नेण्याचा प्रयत्न चौघांनी केला. मात्र अन्य सुरक्षारक्षक मदतीला धावून आल्याचे पाहून चोरट्यांनी कापलेले झाड सोडून पोबारा केल्याची घटना घडली. दिनेश जगन्नाथ सोनवणे (रा. मखमलाबादगाव, नाशिक) या सुरक्षारक्षकाच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (ता.6) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चौघांनी भोसला सैनिकी शाळेच्या कंमाटो गेटवर असलेल्या केबीनमध्ये असलेल्या सुरक्षारक्षक दिनेश यास तलवारीचा धाक दाखविला. त्यास कॅबीनमध्ये ठेवून संशयितांनी हनुमान मंदिराजवळील चंदनाचे झाड कटरने कापले आणि चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी अन्य सुरक्षारक्षक हे मदतीला धावून आल्याचे पाहून चोरट्यांनी कापलेले चंदनाचे झाड तेथेच टाकून पळ काढला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. बी. शेडकर हे करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews