वाहन कर्जाच्या नावाखाली बॅंकेला पावणे चार कोटींचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नाशिक : महागडे वाहन खरेदी करण्यासाठी बनावट दस्तऐवज बनवून 17 संशयितांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या विविध शाखांमध्ये वाहन कर्ज मंजूर करून घेतले आणि बॅंकेला तब्बल 3 कोटी 70 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कृष्ण निरंजन (रा. स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे गेस्ट हाऊस, सिडको कॉलनी, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सचिन पर्बत जाधव (43, रा. परमोरी, अवनखेड, ता. नाशिक) याच्यासह 17 संशयितांनी महागडे वाहने खरेदी करण्यासाठी खोटी व बनावट कागदपत्रांचा दस्तऐवज तयार केला आणि ते प्रस्ताव संगनमताने स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शहरातील विविध शाखांमध्ये सादर केले. त्यावर संशयितांनी वाहन कर्ज मंजूर करून घेतले. त्यानंतर संशयितांनी त्या वाहनकर्जांची परतफेड केले नाही. बॅंकेने त्यासंदर्भात चौकशी केल्यानंतर संशयितांनी सादर केलेले दस्तऐवज बनावट असल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे, कर्जावर घेतलेल्या वाहनांसह संशयित बेपत्ता झाले आहेत. परंतु संशयितांनी बॅंकेला तब्बल 3 कोटी 70 लाख 11 हजार 459 रुपयांना गंडा घातला आहे. सदरचा प्रकार 2018 मध्ये घडला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews