अल्पवयीन मुलींचा विनयभंग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

नाशिक : जेलरोड परिसरातील श्रमिकनगर येथे दोघा अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल गंगाराम पाईकराव (27, रा. श्रमिकनगर, कॅनलरोड, जेलरोड) असे संशयिताचे नाव आहे. पीडित चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीनुसार, गेल्या गुरुवारी (ता.10) दुपारच्या सुमारास पीडित 5 वर्षांची चिमुकली व तिची 6 वर्षांची मैत्रीण या दोघी त्यांच्या घरासमोर खेळत होत्या. त्यावेळी संशयिताने दोघांना खेळण्याच्या बहाण्याने त्याच्या बहिणीच्या पत्र्याच्या खोलीत नेले आणि आतून कडी लावून घेत, दोन्ही चिमुकल्यांशी अश्‍लिल चाळे करीत त्यांचा विनयभंग केला.

नाशिक : जेलरोड परिसरातील श्रमिकनगर येथे दोघा अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल गंगाराम पाईकराव (27, रा. श्रमिकनगर, कॅनलरोड, जेलरोड) असे संशयिताचे नाव आहे. पीडित चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीनुसार, गेल्या गुरुवारी (ता.10) दुपारच्या सुमारास पीडित 5 वर्षांची चिमुकली व तिची 6 वर्षांची मैत्रीण या दोघी त्यांच्या घरासमोर खेळत होत्या. त्यावेळी संशयिताने दोघांना खेळण्याच्या बहाण्याने त्याच्या बहिणीच्या पत्र्याच्या खोलीत नेले आणि आतून कडी लावून घेत, दोन्ही चिमुकल्यांशी अश्‍लिल चाळे करीत त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात विनयभंग व बाललैंगिक अत्याचाराच्या पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सहाय्यकपोलीस निरीक्षक राऊत गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews