युवतीवरील प्राणघातक हल्ल्यातील संशयित मोकाट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

लासलगाव पोलिसांची भूमिका संशयास्पद : पीडित कुटूंबिय दहशतीखाली 

नाशिक : महिनाभरापूर्वी लासलगाव येथे अल्पवयीन युवतीवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला करणारा संशयित अद्यापही मोकाट आहे. लासलगाव पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे संशयित मोकाट असल्याने पीडित कुटूंबिय दहशतीखाली वावरत आहेत. तरी याप्रकरणाची सखोल चौकशी करून संशयित अतिश दगडु ढगे (रा. टाकळी विंचुर, ता. निफाड, जि. नाशिक) यास अटक करण्याची मागणी पीडित कुटूंबियांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. 

नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना पीडित कुटूंबियांनी निवेदन दिले आहे. संशयित अतिश ढगे याचे पीडित युवतीवर एकतर्फी प्रेम असून पीडितेने त्यास नकार दिला होता. त्यातूनच संशयित ढगे याने गेल्या 9 सप्टेंबर रोजी रात्री पीडितेच्या घरात चाकू घेऊन घुसला आणि तिच्यावर हात, पोटावर आणि शरीरावर पाच-सहा वार करीत तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर संशयिताने स्वत:वरही किरकोळ वार करून घेतल्या होत्या. याप्रकरणी लासलगाव पोलीसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 
परंतु, किरकोळ जखमी असलेला संशयित ढगे गेल्या महिनाभरापासून मोकाट फिरतो आहे. लासलगाव पोलिसांकडून संशयिताविरोधात अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. उपचारानंतर तो रूग्णालयातून बाहेर येऊनही त्यास पोलिसांनी अटक केलेली नाही. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी जाबजवाबही संशयिताला मदतीचे होतील असेच घेतल्याचा आरोप पीडित कुटूंबियांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणी संशयिताला अटक व्हावी आणि तपास कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी पीडित कुटूंबियांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, संशयिताच्या भितीपोटी पीडित कुटूंबिय दहशतीखाली वावरत असून पीडितेचे पितृछत्र काही महिन्यापूर्वीच हरपले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews