भागीदारीच्या नावाखाली 14 लाखांना गंडा 

Residential photo
Residential photo

नाशिक : केबल व्यवसायामध्ये भागीदारी करण्याचे आमिष दाखवून संशयिताने महिलेस तब्बल 14 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. विजया कैलास पवार (रा. अयोध्यानगरी, नाशिक-पुणा महामार्ग, उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित रोहन भोळे (रा. जयप्रकाश हौसिंग सोसायटी, गंधर्वनगरी, नाशिकरोड) याने गेल्या जानेवारी 2018 मध्ये विजय पवार यांच्याशी ओळख केली. त्यानंतर त्याने केबल व्यवसायामध्ये भागीदारी करण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्याने श्रीमती पवार यांच्याकडून वेळोवेळी भागीदारीच्या व्यवसायासाठी 14 लाख 10 हजार रुपये घेतले. परंतु संशयिताने त्यांना व्यवसायात कोणतीही भागीदारी करून न घेता त्यांनी दिलेल्या पैशांचा अपहार केला. त्याचा जाब विचारला असता, संशयिताने शिवीगाळ करीत दमदाटी केली. याप्रकरणी उपनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com