नाशिक : ठक्कर बाजार समोरील राजदूत हॉटेलसमोर रिक्षा का लावतो अशी कुरापत काढून दोघा संशयितांनी रिक्षाचालकाला मारहाण केली आणि त्याची रिक्षा व मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली. मंगेश कचरू पटेकर (28, रा. गंजमाळ झोपडपट्टी, भद्रकाली), चंद्रकांत उर्फ राहुल संभाजी बर्वे (34, रा. आंबेबहुला, ता. नाशिक) असे दोघा संशयितांचे नाव आहे. शिवशंकर पाचीप्रसाद चौहान (रा. माळी कॉलनी, श्रमिकनगर, सातपूर) या रिक्षाचालकाच्या फिर्यादीनुसार, गेल्या सोमवारी (ता.14) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील हॉटेल राजदूत समोर तो प्रवाशांच्या प्रतिक्षेत होता. त्यावेळी दोघे संशयित आले आणि तू इथे रिक्षा का लावतो. तुझ्या बापाची जागा आहे का, तू इथे दादागिरी करतो का, तू या रिक्षा स्टॉपवर रिक्षा का थांबवतो अशी धमकी देत दोघांनी बेदम मारहाण केली. तसेच, त्याच्याकडील मोबाईल आणि 25 हजार 500 रुपयांची रिक्षा (एमएच 15 एके 5535) बळजबरीने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.