नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

नाशिक : फ्लॅट खरेदीचा व्यवहार फिसकटल्यानंतर आगाऊ रकमेतील काही रक्कम परत केली आणि उर्वरित रकमेच्या मोबदल्याने मुलाला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. श्रीकांत रमेश पाळदे (रा. दसक-पंचक, लोखंडेमळा, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. रमेश तानाजी पाथरे (रा. समर्थनगर, मखमलाबाद-पेठ रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित पाळदे याच्याशी फ्लॅटसंदर्भात व्यवहार झाला होता. त्या खरेदी व्यवहारापोटी श्री. पाथरे यांनी संशयित पाळदे यास 7 लाख रुपये दिले होते. परंतु नंतर सदरचा व्यवहार फिसकटला.

नाशिक : फ्लॅट खरेदीचा व्यवहार फिसकटल्यानंतर आगाऊ रकमेतील काही रक्कम परत केली आणि उर्वरित रकमेच्या मोबदल्याने मुलाला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. श्रीकांत रमेश पाळदे (रा. दसक-पंचक, लोखंडेमळा, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. रमेश तानाजी पाथरे (रा. समर्थनगर, मखमलाबाद-पेठ रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित पाळदे याच्याशी फ्लॅटसंदर्भात व्यवहार झाला होता. त्या खरेदी व्यवहारापोटी श्री. पाथरे यांनी संशयित पाळदे यास 7 लाख रुपये दिले होते. परंतु नंतर सदरचा व्यवहार फिसकटला. त्यामुळे संशयिताने 4 लाख 20 हजार रुपये श्री.पाथरे यांना परत केले. तर उर्वरित 2 लाख 80 हजार रुपये परत न देता, त्या मोबदल्यात श्री.पाथरे यांचा मुलगा विकी यास जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक-टंकलेखक या पदावर नोकरी लावून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी संशयिताने बनावट नियुक्तीपत्रही देत त्यांची फसवणूक केली होती. सदरचा प्रकर एप्रिल 2014 ते ऑगस्ट 2016 या दरम्यान घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक नायद शेख करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews