न्यायालयाच्या आदेशाने वर्षानंतर गुन्हा दाखल 

Residential photo
Residential photo

नाशिक : पवननगर येथे चारचाकी कार बाजूला पार्क करण्यास सांगितले असता, संशयित दाम्पत्याने मुलास बेदम मारहाण केल्याचा प्रकार वर्षभरापूर्वी घडला होता. परंतु, पोलिसांकडून दाद न मिळाल्याने न्यायालयात धाव घेतल्यानंतर, आता वर्षभरानंतर पोलिसात न्यायालयाच्या आदेशानुसार अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
प्रकाश बाबुराव कांबळे, गायत्री प्रकाश कांबळे (30, दोघे रा. पवननगर, सिडको, नाशिक) असे दोघा संशयितांची नावे आहेत. सीमा राधेशाम प्रजापती (रा. पवननगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या 17 ऑक्‍टोबर 2018 रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संशयित प्रकाश कांबळे याने श्रीमती प्रजापती यांच्या घरासमोर कार पार्क केली होती. त्यावरून श्रीमती प्रजापती यांच्या मुलाने संशयित कांबळे यास सदरची कार बाजुला घेण्यास सांगितले असता, संशयितास त्याचा राग आला आणि त्याने बाबुंच्या जाड दांड्याने मुलाच्या पाठीवर, पायावर मारहाण करीत जखमी केली. तर संशयिताची पत्नीनेही बाबूंने मारहाण करीत, शिवीगाळ केली आणि उलट पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी तक्रारदारांच्या तक्रारीची पोलिसांनी त्यावेळी दखल घेतली नव्हती. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने आदेश दिल्याने वर्षभराने अंबड पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक एस.एन. शिंदे हे करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com