खैरे पितापुत्रांविरोधात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल 

खैरे पितापुत्रांविरोधात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल 

नाशिक : शहरातील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्यास मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरसेवक शाहू खैरे व मुलासह इतरांविरोधात अपहरण, मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडित युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो कॉलेजरोडवरील विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. गेल्या महिन्यात 11 सप्टेंबर 2019 रोजी संशयित कृष्णा बोरसे याने हत्याराचा धाक दाखवून पीडित युवकाला अपहरण करून रोकडोबा तालिम संघ येथील शाहू खैरे यांच्या कार्यालयात आणले. याठिकाणी संशयित अमर खैरे याने पीडित युवकाला जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, मला जीएसच्या निवडणूकीत उभे राहायचे असून तु कॉलेजला दिसू नको असे सुनावले. शाहु खैरे यांनीही पीडित युवकाला जातीवाचक शिवीगाळ करीत दमदाटी केली. त्यानंतर खैरे यांच्या सुरक्षारक्षकांसह इतरांनी त्यास बेदम मारहाण केली. तसेच, पोलिसात तक्रार न करण्याची धमकीही दिली. याप्रकरणी कृष्णा सरोदे, शाहू खैरे, अमर खैरे यांच्यासह अन्य संशयितांविरोधात ऍक्‍ट्रोसिटी आणि अपहरण, दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com