पोलीसाने प्रेमविवाह केलेल्या पत्नीची आत्महत्त्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

नाशिक : पोलिसांच्या स्नेहबंधन पार्कमध्ये राहणाऱ्या पोलीसाने स्वत:चे पहिले लग्न लपवून दुसरीशी प्रेमविवाह केला. तर लग्नानंतर जात लपविली म्हणून तिला जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यामुळे पीडितेने राहत्या घरातच गळफास घेत आत्महत्त्या केली. याप्रकरणी संशयित पोलीस कर्मचाऱ्यास अटक करण्यात येऊन, आत्महत्त्येस प्रवृत्त आणि जातीवाचक शिवीगाळप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई कुंदन सूर्यभान भाबड (32, रा. स्नेहबंधन पार्क, शरणपूररोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तर रोहिनी कुंदन भाबड असे मयत पत्नीचे नाव आह. कुंदन सुनील आढाव (रा. जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, उपनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई कुंदन भाबड याने रोहिनी हिच्यासोबत प्रेमाचे नाटक केले. कुंदन भाबड याचे पहिले लग्न झालेले असतानाही त्याची माहिती रोहिणीला दिली नाही. तसेच रोहिनीसोबत रजिस्टर पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर, तू तुझी जात लपवली अशी कुरापत काढून कुंदन भाबडने रोहिणीचा छळ सुरु केला व तिला मारहाणही केली. यामुळे रोहिणीने स्नेहबंधन पार्क येथे राहत्या घरात गळफास घेतला. रविवारी (ता.27) सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यात कुंदन भाबडच्या छळाला कंटाळून रोहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला. त्यानुसार, सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून कुंदन भाबडला अटक केली आहे. त्याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी, तसेच ऍक्‍ट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik/crimenews