विजेचा शॉक बसून मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

नाशिक : कामटवाडा शिवारातील रो-हाऊसला पाणी मारताना विजेचा शॉक बसून एकाचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. योगेश शांताराम पवार (35, रा. सप्तशृंगी बिल्डिंग, विखे पाटील शाळेजवळ, माऊली लॉन्स, कामटवाडा शिवार, अंबड) असे नाव आहे. योगेश हे शनिवारी (ता.2) सायंकाळी रो-हाऊसच्या बांधकामाला नळीने पाणी मारीत होते. त्यावेळी जवळूनच वीज वितरण कंपनीच्या खांबावरून तार गेलेली होती. त्यावेळी त्या तारेला पाण्याचा स्पर्श होऊन त्यात विजेचा करंट उतरला आणि त्याचा शॉक त्यांना बसला. ते जागीच बेशुद्ध बसले असता, उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

नाशिक : कामटवाडा शिवारातील रो-हाऊसला पाणी मारताना विजेचा शॉक बसून एकाचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. योगेश शांताराम पवार (35, रा. सप्तशृंगी बिल्डिंग, विखे पाटील शाळेजवळ, माऊली लॉन्स, कामटवाडा शिवार, अंबड) असे नाव आहे. योगेश हे शनिवारी (ता.2) सायंकाळी रो-हाऊसच्या बांधकामाला नळीने पाणी मारीत होते. त्यावेळी जवळूनच वीज वितरण कंपनीच्या खांबावरून तार गेलेली होती. त्यावेळी त्या तारेला पाण्याचा स्पर्श होऊन त्यात विजेचा करंट उतरला आणि त्याचा शॉक त्यांना बसला. ते जागीच बेशुद्ध बसले असता, उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सातपूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews