esakal | ट्रकचे पंक्‍चर चाक काढणाऱ्यांना आयशरने उडविले 
sakal

बोलून बातमी शोधा

Residential photo

ट्रकचे पंक्‍चर चाक काढणाऱ्यांना आयशरने उडविले 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

एक ठार; एक जखमी : महामार्गावरील गरवारे पॉईट येथील उड्डाणपुलावरील घटना 

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर आज (ता.3) पहाटेच्या सुमारास ट्रक पंक्‍चर झाल्याचे चाक बदलत असताना, पाठीमागून आलेल्या अज्ञात आयशर ट्रकने दोघांना उडविले. यात एकाजण ठार झाला तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबड पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शाहरूख साजिद सय्यद (20, रा. कबीरगंज, धुळे) असे ठार झालेल्या युवकाचे नाव असून अमोल शिंदे (25, रा. भुसावळ) गंभीर जखमी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख सय्यद, अमोल शिंदे आणि तिघे असे पाच जण धुळे येऊन माल भरलेला ट्रक घेऊन मुंबईकडे निघाले होते. आज (ता.3) पहाटे पाच वाजता त्यांचा ट्रक महमार्गावरील गरवारे पॉईंटवरील उड्डाणपुलावर आला असता टायर पंक्‍चर झाले. पंक्‍चर झालेले टायर बदलण्यासाठी शाहरूख व अमोल हे दोघे काम करीत होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील आयशर ट्रकने दोघांना जोरदार धडक दिली. यात शाहरुख याचे दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली तर अमोलही जखमी झाला. दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास शाहरुख याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी अंबड पोलिसात अज्ञात ट्रकचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

loading image
go to top