पिन्टो कॉलनीत वृद्धेची सोनसाखळी खेचली 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

नाशिक : जुना सायखेडा रोडवरील पिंटो कॉलनीमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये उन्हात बसलेल्या वृद्धेच्या गळ्यातून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने सोन्याची पोत ओरबाडून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सुलोचना विठ्ठल जाधव (87, रा. पिन्टो कॉलनी, जुना सायखेडा रोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, सुलोचना जाधव या गेल्या शनिवारी (ता. 28) दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्या राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उन्हांत बसल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयिताने सुलोचना यांच्याकडे पत्ता विचारण्याचा बहाणा करीत त्यांच्या गळ्यातील 1 तोळ्याची 30 हजार रुपये सोन्याची पोत ओरबाडून नेली.

नाशिक : जुना सायखेडा रोडवरील पिंटो कॉलनीमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये उन्हात बसलेल्या वृद्धेच्या गळ्यातून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने सोन्याची पोत ओरबाडून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सुलोचना विठ्ठल जाधव (87, रा. पिन्टो कॉलनी, जुना सायखेडा रोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, सुलोचना जाधव या गेल्या शनिवारी (ता. 28) दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्या राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उन्हांत बसल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयिताने सुलोचना यांच्याकडे पत्ता विचारण्याचा बहाणा करीत त्यांच्या गळ्यातील 1 तोळ्याची 30 हजार रुपये सोन्याची पोत ओरबाडून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या गुन्ह्यातील संशयित सोनसाखळी चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यानुसार अधिक सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. खडके हे तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenewschainsnatching

टॅग्स