लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर वारंवार बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नाशिक : विवाहितेशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून अश्‍लिल फोटो काढले. ते नवऱ्याच्या दाखविण्याच्या धमकी देत तिला लॉजवर नेऊन बलात्कार केल. विवाहितेच्या पतीनेही तिला घराबाहेर काढून दिल्यानंतर तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत संशयिताने तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय संजय दिवे (रा. समतानगर, आगरटाकळी, उपनगर, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. 

पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित दिवे याचे विवाहितेशी प्रेमसंबंध होते. तिच्या लग्नानंतरही तो तिला भेटायला यायचा. त्यावेळी त्याने पीडितेशी अश्‍लिल चाळे करतानाचे सेल्फी फोटो काढले होते. सदरचे फोटो तिच्या नवऱ्याच्या दाखविण्याची धमकी देते, त्याने पीडितेला चार वेळा औरंगाबाद रोडवरील कुणाल लॉजवर नेऊन पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, सदरची बाब पीडितेच्या पतीला समजल्याने त्याने गेल्या 30 जुलै रोजी पीडितेला घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर संशयित अक्षय दिवे याने पुन्हा पीडितेची भेट घेतली आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून, तसेच तिच्या पतीच्या ताब्यात असलेला मुलगा परत मिळवून देतो असे सांगितले आणि पीडितेच्या स्वत:च्या घरी तर कधी त्याची आत्या शारदा प्रकाश जाधव यांच्या घरी नेऊन बळजबरीने पीडितेवर बलात्कार केला. पीडितेला आई-वडील नसल्याचा गैरफायदा घेत संशयिताने तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला. तसेच, पीडितेच्या मनाविरुद्ध तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक बी.के. गवळी हे करीत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimerapenews