वशिकरणाच्या आमिषातून महिलेला पाच लाखांचा गंडा 

Residential photo
Residential photo

नाशिक : आयुष्यातील अडचणी सोडविण्यासाठी वशीकरणाचे आमिष दाखवून अज्ञात संशयिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेची तब्बल 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याच प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
कोमल नंदकुमार पतंगे (रा. विजय वसाहत, चांडक सर्कल, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात संशयिताने गेल्या जुलै महिन्यात पीडितेला फोन करून व नंतर व्हॉटसऍपवरून संपर्क साधून आयुष्यातील अडचणीवर मात करण्यासाठी वशिकरणाचे आमिष दाखविले. वारंवार संपर्क साधून संशयिताने पीडितेचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर संशयिताने वशिकरणासाठीच्या आमिषातून पीडितेला वारंवार ऑनलाईन पैसे भरण्यास सांगितले. पैसे न भरल्यास पीडितेला जीवाला धोका असल्याची धमकीही दिली. त्यामुळे पीडितेने 4 लाख 87 हजार 500 रुपयांची रक्कम भरली. परंतु फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com