डेग्यूसदृश्‍य तापाने मुलाचा बळी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

नाशिक : जुन्या नाशिकमधील काजीपुरातील 12 वर्षीय मुलाचा डेंग्यूसदृश्‍य तापाने मृत्यु झाला. मुनिरुल शफिकुल शेख (12, रा. काजीपुरा, विठ्ठा मंदिराजवळ, जुने नाशिक) असे मुलाचे नाव आहे. मुनिरुल याच्यावर आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. आज (ता.3) सकाळी त्याची प्रकृती खालावल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैदयकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. मुनिरुल यास डेंग्यूसदृश्‍य लक्षण असल्याची सांगितले जाते. वैद्यकीय नमुने घेऊन शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेले आहेत. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik/dhengue/news