रोजगाराच्या आमिषाने 170 महिलांना लाखोंचा गंडा 

Residential photo
Residential photo

मातोश्री महिलागृह उद्योगविरोधात गुन्हा दाखल 

नाशिक : मातोश्री महिलागृहाच्या लघु उद्योगाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील सुमारे 170 महिलांना तब्बल 3 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरनगर पोलिसात पुण्याच्या मातोश्री महिलागृहाच्या चार महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मातोश्री महिलागृहाची सीएमडी रिबेका राजेश रेड्डी (40, रा. चिंचवड, पुणे), जनरल मॅनेजर माधुरी जाधव (35, रा. भोसरी, पुणे), मातोश्री महिला उन्नती संस्थेची विभागीय अध्यक्षा सपना अमळनेरी (36, रा. शिरूर, पुणे), मातोश्री फुडस्‌ विभागीय अध्यक्ष सुनिता आहेर (45, रा. गणोरे, ता.अकोले, जि. अहमदनगर) अशी संशयितांची नावे आहेत. 
चंद्रज्योती सोमनाथ आहेर (रा. नरहरीनगर, पाथर्डीफाटा, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, 14 सप्टेंबर 2017 ते 20 मार्च 2018 या दरम्यान, संशयितांनी फिर्यादी आहेर यांच्यासह 168 महिलांना मातोश्री महिलागृहाच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी संशयितांनी महिलांचा विश्‍वास संपादन करीत, त्यांच्याकडून प्रत्येकी 1 हजार 500 रुपये असे 2 लाख 52 हजार रुपये लघु उद्योगाकरिता जमा केले. त्यानंतर फिर्यादी चंद्रज्योती आहेर यांच्याकडून 20 हजार रुपये आणि शुभांगी गलांडे यांच्याकडून 25 हजार रुपये घेतले. संशयितांनी असे 2 लाख 97 हजार रुपये महिलांकडून घेतले. परंतु संशयितांनी सदरील रकमेचा अपहार करीत, त्यांची फसवणूक केली. कोणताही लघुउद्योग वा रोजगार महिलांना मिळवून न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी संशयित चारही महिलांविरोधात इंदिरानगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. के. जगताप हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com