मौल्यवान गणपतींसाठी कडेकोट सुरक्षा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

सीसीटीव्ही, पोलिसांसह स्वयंसेवकांचा जागता पहारा 

नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत 39 मौल्यवान गणपतींची स्थापना गणेश मंडळांनी केली आहे. या गणपतींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर आहेच. शिवाय, पोलीसांच्या बंदोबस्तासह मंडळांच्या स्वयंसेवकांचाही कडेकोट पहाराही सज्ज ठेवण्यात आलेला आहे. 

सीसीटीव्ही, पोलिसांसह स्वयंसेवकांचा जागता पहारा 

नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत 39 मौल्यवान गणपतींची स्थापना गणेश मंडळांनी केली आहे. या गणपतींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर आहेच. शिवाय, पोलीसांच्या बंदोबस्तासह मंडळांच्या स्वयंसेवकांचाही कडेकोट पहाराही सज्ज ठेवण्यात आलेला आहे. 

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये यंदा 717 मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. यामध्ये 39 मौल्यवान गणपतींचा समावेश असून भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सर्वाधिक 10 मौल्यवान गणपती आहेत. मौल्यवान गणपतींमध्ये सत्यम सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ-भद्रकाली, जाणता राजा मित्र मंडळ, डिंगरआळी, भद्रकाली कारंजा मित्र मंडळ, राजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक कला मंडळ, भद्रकाली), रोकडोबा मित्रमंडळ, खैरे गल्ली, युवक उन्नती मित्र मंडळ, भद्रकाली, शिवसेना युवक मित्र मंडळ, भद्रकाली, श्री भक्ती मित्र मंडळ, भद्रकाली, राजमुद्रा मित्र मंडळ,हुंडीवाला लेन, श्री नरहरी राजा सामाजिक संस्था, बी.डी.भालेकर मैदान, रविवारी कारंजा गणेश मित्र मंडळ, रविवार कारंजा, तिळ भांडेश्‍वर लेन मित्र मंडळ, दहिपुल, पगडबंद लेन मित्र मंडळ, सराफ बाजार, गोरेराम लेन मित्रमंडळ, रविवार कारंजा, शिवप्रकाश नवप्रकाश कला, क्रीडा, सांस्कृतिक मित्र मंडळ व नाशिकचा राजा, घनकर लेन, अशोकस्तंभ मित्र मंडळ, अशोकस्तंभ. युवक मित्र मंडळ, मुंबईनाका. नवनिर्माण मित्र मंडळ, मखमलाबाद नाका, एसएफसी फाऊेंडेशन, हिरावाडी, सरदार चौक मित्र मंडळ,सरदार चौक, नवजीवन मित्र मंडळ, हिरावाडी रोड. आपले मित्र मंडळ, आनंदवल्ली. व्यापारी मित्र मंडळ,जुने भाजी मार्केट, रजत नवशा गणपती मित्रमंडळ, सातपूर, जय बजरंग मित्र मंडळ, सातपूर. एकता विविध विकास सेवा मंडळ, सिडको, श्रीकृष्ण कला व क्रीडा मित्र मंडळ, अंबडगाव, इच्छापूर्ती गणेश मंडळ, सिडको, पेलिकन बहुउद्देशीय संस्था, सिडको. वीर सावरकर मित्र मंडळ, भगूर, सौभाग्य मित्र मंडळ, लॅम्परोड, अभिनव मित्र मंडळ, भगूर, वंदे मातरम्‌ संघटना, भगूर. तरुण उत्सव मंडळ, भगूर, मेनरोड मित्र मंडळ, भगूर, विजय अमरदीप मित्र मंडळ, देवळाली कॅम्प. बालाजी फाऊंडेशन मित्र मंडळ, रेजिमेन्टल प्लाझा, देवळाली गाव सार्वजनिक पार मित्र मंडळ,देवळालीगाव, इच्छापूर्ती गणेश मंदिर, गांधीनगर या गणेश मंडळांचा समावेश आहे. या मौल्यवान गणपतींवर सोन्या-चांदीची दागदागिने असून आकर्षक गणपती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. 
मात्र या मौल्यवान गणपतींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे. याशिवाय दिवस-रात्र पोलीस कर्मचारी, होमगार्डची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु तरीही सुरक्षिततेसंदर्भातील जबाबदारी मंडळांवर सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे दिवसरात्र मंडळांच्या स्वयंसेवकांचाही कडेकोट पहारा बसविण्यात आलेला आहे. याशिवाय पोलीसांच्या दिवस-रात्र गस्तीपथकांमार्फत सातत्याने गस्तही घातली जाते आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikganapatisecuritynews