दरोड्यात सुरक्षारक्षकाचा खून; मात्र चोरी साबित होऊन शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नाशिक : आशावाडी शिवारात रात्रीच्या वेळी पिस्टन पंप चोरीसाठी गेलेल्या तिघांनी रखवालदारास बेदम मारहाण करून त्यास विहिरीत फेकून दिले. तर चोरलेला पंपही दुसऱ्या विहिरीत फेकून दिला. परंतु सदरच्या खटल्यात सरकारी पक्षाला रखवालदाराचा खून झाल्याचे सिद्ध करता न आल्याने एकाला तीन वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. तर दुसरा आरोपी काही महिन्यांपूर्वीच मयत झाला. तिसरा आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटला. 

नाशिक : आशावाडी शिवारात रात्रीच्या वेळी पिस्टन पंप चोरीसाठी गेलेल्या तिघांनी रखवालदारास बेदम मारहाण करून त्यास विहिरीत फेकून दिले. तर चोरलेला पंपही दुसऱ्या विहिरीत फेकून दिला. परंतु सदरच्या खटल्यात सरकारी पक्षाला रखवालदाराचा खून झाल्याचे सिद्ध करता न आल्याने एकाला तीन वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. तर दुसरा आरोपी काही महिन्यांपूर्वीच मयत झाला. तिसरा आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटला. 

निलेश नवसू बगर (28, रा. तुंगरदरा, पो. आशेवाडी, ता. दिंडोरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर सचिन राजाराम बगर (21, रा. तुंगलदरा) हा आठ महिन्यांपूर्वी मयत झाला असून उत्तम विश्‍वनाथ चौथे (29, रा. तुंगलदरा) हा निर्दोष सुटला. 15 ऑगस्ट 2016 रोजी रात्री साडेआठ नऊ वाजेच्या सुमारास तिघेही चोरीच्या उद्देशाने आशेवाडी शिवारातील शिवाजी बोडके यांच्या शेतात गेले होते. त्यावेळी बोडके यांच्या शेतात गेल्या 14 वर्षांपासून रखवालदारी करणारा सुदाम पांडुरंग सितान (65, रा. आशेवाडी) हा गरात झोपलेला होता. तिघांनी त्यास बेदम मारहाण केली. सचिन बगर याने लाकडी दांड्याने डोक्‍यात, हनुवटीवर मारल्याने सुदान गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर त्यांनी त्यास नजिकच्या गणेश बोडके यांच्या विहिरीत फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच, घरातून चोरलेला फवारणी करण्याचा हातपंप पिस्टन चोरून तोही भीका खाडे यांच्या विहिरीत फेकून दिला. दुसऱ्या दिवशी गुन्ह्याची उकल होऊन याप्रकरणी दिंडोरी पोलीसात दरोडा व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासी अधिकारी व दिडोरीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. 
सदरचा खटला जिल्हा न्यायधीश एन. जी. गिमेकर यांच्यासमोर चालला. सरकारी पक्षातर्फे ऍड. रवींद्र निकम यांनी कामकाज पाहताना 8 साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने निलेश बगर यास चोरीच्या गुन्ह्यात 3 वर्षे सक्तमजुरी व 5हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मात्र सरकारी पक्षाला प्रत्यक्ष साक्षीदाराअभावी खूनाचा गुन्हा साबित करता आला नाही. तसेच, आठ महिन्यांपूर्वीच सचिन बगर मयत झाला. तर, उत्तम चौथे याची पुराव्याअभावी सुटका झाली. 

कबुली जवाबामुळे झाली शिक्षा 
आरोपी निलेश बगर याने हातपंप पिस्टन चोरीची कबुली दिली होती. तसेच त्यानेच दिलेल्या कबुली जबाबानुसार पिस्टन पंप विहिरीत सापडला होता. परंतु सुदान सितान यांच्या खुनाबाबत प्रत्यक्ष साक्षीदार वा पुरावा पोलिसांना मिळाला नाही. केवळ कबुली जवाबामुळे एकाला न्यायालयाने शिक्षा ठोठावली. यातून पोलिसांचे अपयशच दिसून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikjudgement