किऑक्‍समुळे अनेक बेशिस्तांना घरपोच दंडाच्या पावत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

बेशिस्तांना दणका : सिटी सेंटर मॉल सिग्नलवरील सीसीटीव्हीचा परिणाम 

नाशिक : उंटवाडी रोडवरील सिटी सेंटर मॉल सिग्नलवर बसविण्यात आलेल्या किऑक्‍स मशिनच्या सीसीटीव्हीमध्ये विनाहेल्मेट व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना कैद केले. वाहतूक पोलीस शाखेमार्फत सीसीटीव्हीने टिपलेल्या वाहनांच्या क्रमांकांवरून त्या बेशिस्त चालकांना घरपोच दंडाच्या पावत्या देत दणका दिला आहे. 

सिटी सेंटर मॉल सिग्नल चौकात दोन महिन्यांपूर्वी चौकातील वाहनांवर नजर ठेवण्यासाठी तसेच, संकटकालिन परिस्थितीमध्ये तात्काळ मदतीसाठीचे किऑक्‍स यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या यंत्रणेचे उद्‌घाटन पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. गेल्या महिन्यापासून या यंत्रणेतील उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे या कॅमेऱ्यात अनेक बेशिस्त वाहनचालक कैद झाले आहेत. अतिउच्च दर्जाचे कॅमेरे असल्याने बेशिस्त वाहनचालकांच्या वाहनांचा क्रमांकही त्यात टिपला गेला आहे. 
या किऑक्‍स मशिनचा संपर्क थेट वाहतूक शाखेतील नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने सीसीटीव्हीने टिपलेल्या छायाचित्रातून बेशिस्त वाहनचालकांच्या वाहनांचे फोटो घेत, त्या वाहनांवरील क्रमांक घेतले. या वाहन क्रमांकांवरून त्या वाहन चालकांची माहिती घेतली आणि त्यांच्या घरच्या पत्त्यावर तसेच, मोबाईल क्रमांकावर दंडाची पावती (चलन) रवाना करण्यात आले आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना चांगलाच दणका बसला आहे. यात प्रामुख्याने हेल्मेट परिधान न करणारे वाहनचालकांसह काही सिग्नलचे उल्लंघन करतानाही टिपले गेले आहेत. येत्या काळात यात आणखीही काही अत्याधुनिक सोयीसुविधांचा अंतर्भाव केला जाणार आहे. 

वाहतूक शाखेत नेत्रतपासणी 
नाशिक शहर वाहतूक पोलीस शाखेमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेत्रतपासणी करण्यात आली. रामोळे आय हॉस्पिटल्सतर्फे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त मंगलसिंह सूर्यंवशी यांच्यासह वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक, कर्मचाऱ्यांचीही नेत्रतपासणी करण्यात आली. तसेच, उपचारही करण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik/kox/traffice/crimenews