लुटमार करणाऱ्या दोन टोळ्या गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई : गंगापूर धरण; घोटी-सिन्नर रस्त्यावर केली लुटमार 

नाशिक : जिल्ह्यात लुटमार करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला असता, ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने दोन टोळ्यांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. गंगापूर धरण परिसरात येणाऱ्या प्रेमीयुगुल आणि घोटी-सिन्नर मार्गावर प्रवाशांना अडवून या टोळ्या लूटमार करीत होत्या. अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 

स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई : गंगापूर धरण; घोटी-सिन्नर रस्त्यावर केली लुटमार 

नाशिक : जिल्ह्यात लुटमार करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला असता, ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने दोन टोळ्यांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. गंगापूर धरण परिसरात येणाऱ्या प्रेमीयुगुल आणि घोटी-सिन्नर मार्गावर प्रवाशांना अडवून या टोळ्या लूटमार करीत होत्या. अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 

सुनिल सोमनाथ वाडगे (21), गणेश रूंजा गुंबाडे (20, दोघे रा. पिंपळगाव गरूडेश्‍वर, ता.जि.नाशिक) यांना गंगापूर धरण व सुला वाईन क्षेत्रात आलेल्या पर्यटकांच्या लुटमारप्रकरणी अटक केली आहे तर, राजु रंगास्वामी भोजया (21, रा. आनंदरोड, देवळाली कॅम्प), रोहित किसन कुसमाडे (19, रा.चारणवाडी, देवळाली कॅम्प), शिवा संजय मोरे (19, रा. राजवाडा, संसारीगाव, ता.जि.नाशिक) यांना सिन्नर-घोटी मार्गावर लुटमार केल्याप्रकरणी अटक केली असून तिघांचा शोध सुरू आहे. 
गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हयात लुटमारीच्या घटना वाढल्या होत्या. त्यासंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी गुन्हेशाखेला सूचना केल्या होत्या. विशेषत: नाशिक तालुका हद्दीतील गंगापूर धरण, सुला वाईन परिसरात लुटमारीच्या घटना घडल्या होत्या. गुन्हेशाखेच्या पथकाला लुटमार करणारे संशयित पिंपळगाव गरूडेश्‍वर शिवारातील असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने पिंपळगाव गरूडेश्‍वर परिसरात सापळा रचुन संशयित सुनिल सोमनाथ वाडगे, गणेश रूंजा गुंबाडे या दोघांना शिताफीने अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एक व्हीवो कंपनीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली शाईन दुचाकी जप्त करण्यात आली. संशयितांना पोलिसी खाक्‍या दाखविताच गंगापुर धरण आणि सुला वाईन परिसरात आलेल्या पर्यटकांना चाकुचा धाक दाखवुन लुटमार केल्याची कबुली दिली. संशयितांना नाशिक तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
तर, अमोल केदार (रा. पांढुर्ली, ता. सिन्नर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना सिन्नर-घोटी रस्त्यावरील घोरवड घाट परिसरात अडवून त्यांची लुटमार केली होती. संशयितांनी त्यांची शाईन दुचाकी व मोबाईल असा मुद्देमाल चाकुचा धाक दाखवून लुटून नेला होता. याप्रकरणी सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करीत असताना, देवळाली कॅम्प परिसरातून तिघे संशयित राजु रंगास्वामी भोऱ्या, रोहित किसन कुसमाडे, शिवा संजय मोरे यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी संशयित सुरेश मंजुळे, आकाश गायखे, परशुाराम देवकर यांच्या मदतीने लुटमार केल्याची कबुली दिली. संशयितांकडून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील, सहाय्यक निरीक्षक अनिल वाघ, नवनाथ गुरुळे, प्रभाकर पवार, रवींद्र शिलावट, दिलीप घुले, प्रकाश चव्हाणके, प्रीतम लोखंडे, संदीप हांडगे, जालिंदर खरोटे, किरण काकड, हेमंत गिलबिले, कपालेश्‍वर ढिकले, प्रदीप बहिरम, निलेश कातकडे, संदीप लगड, रमेश काकडे यांच्या पथकाने बजावली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik/LCB/crimenews