महाजनादेश यात्रेच्या बाईक अन्‌ रोड शोमुळे वाहतूक मार्गात बदल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

वाहतूक शाखा : बुधवारी दुपारी पर्यायी मार्गांचा वाहनचालकांनी करावा वापर 

नाशिक : भाजपाची राज्यभर सुरू असलेली महाजनादेश यात्रा येत्या बुधवारी (ता.18) नाशिकमध्ये धडकणार आहे. या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी होणार आहे. महाजनादेश यात्रेत प्रारंभी पाथर्डी फाटा ते गोल्फ क्‍लब मैदानापर्यंत बाईक रॅली तर, गोल्फ क्‍लब ते पंचवटी कारंजा अशी महाजनादेश यात्रा निघणार आहे. त्यामुळे शहर वाहतूक पोलीस शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांच्या आदेशान्वये वाहतूक मार्गावर बदल करण्यात आले आहेत. 

वाहतूक शाखा : बुधवारी दुपारी पर्यायी मार्गांचा वाहनचालकांनी करावा वापर 

नाशिक : भाजपाची राज्यभर सुरू असलेली महाजनादेश यात्रा येत्या बुधवारी (ता.18) नाशिकमध्ये धडकणार आहे. या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी होणार आहे. महाजनादेश यात्रेत प्रारंभी पाथर्डी फाटा ते गोल्फ क्‍लब मैदानापर्यंत बाईक रॅली तर, गोल्फ क्‍लब ते पंचवटी कारंजा अशी महाजनादेश यात्रा निघणार आहे. त्यामुळे शहर वाहतूक पोलीस शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांच्या आदेशान्वये वाहतूक मार्गावर बदल करण्यात आले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महामार्गावरील पाथर्डी फाटा येथून येत्या बुधवारी दुपारी तीन वाजता महाजनादेश यात्रेच्या बाईक रॅलीस प्रारंभ होईल. रॅली पाथर्डी फाटा-अंबड लिंक रोड-उत्तमनगर- पवननगर-सावतानगर-दिव्या ऍडलॅब चौक - त्रिमुती चौक-सिटी सेंटर मॉल सिग्नल-संभाजी चौक-दक्षिण मुखी हनुमान मंदिर-मायको सर्कल-तरणतलाव सिग्नल-हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापर्यंत येईल. त्यानंतर महाजनादेश यात्रेला त्रंबक नाका सिग्नल येथून प्रारंभ होऊन, जीपीओ रोड-शाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा चौक-गंजमाळ सिग्नल-शिवसेना भवन-शालिमार चौक-सारडा कन्या मंदिर विदयामंदीर-नेहरू उद्यान-शिवाजी रोड-संत गाडगे महाराज पुतळा चौक-मेन रोड-धुमाळ पॉईन्ट-रविवार कारंजा-पूण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुल-मालेगाव स्टॅण्ड-पंचवटी कारंजा येथे महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे. 
महाजनादेश यात्रेच्या प्रारंभी बाईक रॅलीत शेकडो बाईक सहभागी होणार असल्याने वाहतूक खोळंबण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने बाईक रॅली व रोड शो या मार्गावरील सामान्य वाहतूक बंद करण्यात येणार आहे. दुपारी एक ते महाजनादेश यात्रेच्या समारोप होईपर्यंत वाहतूक मार्गातील बदल राहतील. महाजनादेश यात्रा मार्गातील बाईक रॅली व रोड शोसाठी येणारी वाहने ईदगाह मैदान येथे पार्किंग करावी, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. 
 
असे आहेत वाहतूक मार्गातील बदल 
* पाथर्डीफाटा ते सिडको हॉस्पीटल मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद. अंबडगाव-गरवारे टी पॉईंट या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. 
* सिडको हॉस्पिटल ते उत्तमनगर मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद. माउली लॉन्स, आयटीआय पुल, डीजीपीनगररोड, खुटवडनगररोड या पर्यायी मार्गाचा वापर करावा. 
* उत्तमनगर ते दिव्या ऍडलब वाहतुकीसाठी पूर्णत: बंद. विनयनगर रोड, कामटवाडा रोड या पर्यायी मार्गांचा वापर करावा. 
* दिव्या ऍडलब ते उंटवाडी पुल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद. विनयनगर रोड, कामटवाडा रोड या पर्यायी मार्गांचा वापर करावा. 
* सिटी सेंटर मॉल सिग्नल ते मायको सर्कल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद. सातपूर रोड, शरणपूर रोड सिग्नल, तेथून गंगापूररोड, गोविंदनगर, आयटीआय पुल या पर्यायी मार्गाचा वापर करावा. 
* मायको सर्कल ते त्र्यंबकनाका सिग्नल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद. शरणपूर रोड, चांडक सर्कल, सारडा सर्कल, मुंबईनाका या पर्यायी मार्गाचा वापर करावा. 
* त्रंयंबकनाका सिग्नल-गंजमाळ सिग्नल-शालीमार-सारडा कन्या विद्यालय-नामको बॅंक-तिरंगा चौक-मेनरोड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद. सारडा सर्कल, गडकरी चौक, बादशाही कॉर्नर, गाडगेमहाराज पुल, अशोक स्तंभ, गंगापूर रोड, मुंबईनाका या पर्यायी मार्गाचा वापर करावा. 
* गाडगेमहाराज पुतळा-मेनरोड-धुमाळ पॉईट-रविवार कारंजा-अहिल्याबाई होळकर पुल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद. गंजमाळ सिग्नल, सारडा सर्कल, शालीमार, सांगली बॅंक सिग्नल, वकीलवाडी, अशोकस्तंभ, गंगापूर या पर्यायी मार्गाचा वापर करावा. 
* अहिल्याबाई होळकर पुल-पंचवटी कारंजा वाहतुकीसाठी पूर्णत: बंद. अशोक स्तंभ, गंगापूर रोड, मखमलाबाद रोड, पेठरोड या पर्यायी मार्गाचा वापर करावा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikmahajandeshyatratrafficnews