फायनान्सकडून सॅम्युअल कुटुंबियांच्या नावे 35 लाखांची ठेव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

नाशिक : उंटवाडी रोडवरील मुथुट फायनान्समध्ये गेल्या जून महिन्यातील दरोड्याच्या घटनेत दरोडेखोरांशी दोन हात करताना मृत्यु झालेले साजु सॅम्युअल यांच्या कुंटूंबियांना नावे 35 लाख रुपयांची मुदतठेव फायनान्स कंपनीकडून ठेवण्यात आली आहे. तसेच, सॅम्युअल यांच्या पत्नीला कंपनीमध्ये नोकरी आणि सॅम्युअल यांचा दरमहा वेतनही कुटूंबियांना दिले जाणार असल्याची माहिती मुथुटचे उपमहाव्यवस्थापक संजीव आनंद यांनी दिली. 

नाशिक : उंटवाडी रोडवरील मुथुट फायनान्समध्ये गेल्या जून महिन्यातील दरोड्याच्या घटनेत दरोडेखोरांशी दोन हात करताना मृत्यु झालेले साजु सॅम्युअल यांच्या कुंटूंबियांना नावे 35 लाख रुपयांची मुदतठेव फायनान्स कंपनीकडून ठेवण्यात आली आहे. तसेच, सॅम्युअल यांच्या पत्नीला कंपनीमध्ये नोकरी आणि सॅम्युअल यांचा दरमहा वेतनही कुटूंबियांना दिले जाणार असल्याची माहिती मुथुटचे उपमहाव्यवस्थापक संजीव आनंद यांनी दिली. 

पोलीस आयुक्तालयात आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मुथूट फायनान्सचे उपमहाव्यवस्थापक संजीव आनंद यांनी सदरची माहिती दिली. उंटवाडी रोडवरील मधुरा टॉवरमध्ये मुथुट फायनान्सचे कार्यालय आहे. या कार्यालयात गेल्या 14 जून रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास सहा सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. त्यावेळी कार्यालयात मुंबईहून ऑडिटसाठी आलेले अभियंता सॅजू सॅम्युअल यांनी सुरक्षिततेचा अलार्म वाजविला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या दोघा दरोडेखोरांनी त्यांना मारहाण केली असता, सॅम्युअल यांनीही त्यांना प्रतिकार केला होता. त्यावेळी संशयितांनी त्यांच्यावर आठ गोळ्या झाडून त्यांची हत्त्या केली होती. यात त्याचा जागीच मृत्यु झाला होता. मात्र यामुळे दरोडेखोरांना लुट न करताचा पलायन करावे लागले होते. त्यामुळे त्याक्षणी कार्यालयात असलेले सुमारे 16 कोटी रुपयांचे सोने बचावले होते. 
सॅम्युअल यांच्या धाडसाची मुथुट फायनान्स कंपनीकडून दखल घेतली. सॅम्युअल यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून, सॅम्युअल यांची पत्नी जेस्सी यांना एका रूग्णालयात नोकरी आणि त्यांच्या बॅंक खात्यावर 35 लाख रुपयांची मुदतठेव ठेवली जाणार आहे. तसेच सॅम्युअल यांचे मासिक वेतनाची रक्कम दरमहा कुटूंबियांना दिली जाणार असल्याचे कंपनीचे उपमहाव्यवस्थापक संजीव आनंद सांगितले. साजु यांच्या धाडसामुळे शहर पोलिसांनीही त्यांच्या रिवॉर्डची 2 लाख 10 हजार रुपयांची रक्कम यापूर्वीच सॅम्युअल यांच्या कुटूंबियांना दिली आहे. 

नाशिक पोलिसांना 5 लाखांचे बक्षीस 
मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणी तपास करीत, शहर पोलिसांनी दरोडेखोरांना गजाआड केले. तसेच या गुन्ह्यांचीही उकल करीत, मुख्य सूत्रधारांचाही छडा लावला. याबद्दल मुथूट फायनान्स कंपनीने नाशिक पोलिसांचे कौतुक करीत, पोलीस कल्याण निधीसाठी 5 लाख रुपयांचे बक्षीसही यावेळी जाहीर केले. यावेळी गुन्हेशाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौघुले, सहाय्यक आयुक्त आर.आर. पाटील यांच्यासह गुन्हेशाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikmuthuthnews